Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग;पाच पावरा समाजाचे लोक बचावले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल – (शैलेश चौधरी) – बुधवारी दुपारी दोन वाजेपासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी धरण ओव्हरफ्लो झाले.८० टक्के धरण भरत असतांना अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.त्यामुळे ग्रामस्थांनी व पोलीस पाटलांनी तालुका प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना केल्या. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी बुधवारी रात्रभर जागरण करून हनुमंत खेड्याचे ग्रामस्थ, व अंजनी प्रकल्पाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सतर्कता दाखवली.त्यामुळे अंजनी धरण ८० टक्के भरले असतांना रात्री ११:३० वाजता अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु होता.

कासोदा परिसरात १०२ मि.मी.अर्थात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.धुंवाधार पाऊस अंजनी नदीला आलेला पुर व अंजनी धरणाचा पाण्याचा विसर्ग यामुळे हनुमंत खेडे,मजरे,सोनबर्डी, नांदखुर्द बु.,नांदखुर्द खु.,एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.याशिवाय अंजनी धरणाच्या परिसरातील नदी काठा लगतच्या भागात कासोदा,आडगाव,तळई, फरकांडे, उमरे व इतर गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अंजनी धरणाला लागुन असलेल्या काळा बांधा-या नजीकच्या शेतामध्ये व स्मशानभुमीमध्ये पाणी प्रवाहीत झाल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहे. एरंडोल येथे पाच जणांचे प्राण वाचले.जळू जवळील चंदनबर्डी येथील भीमसिंग भुना सोनवणे ( वय ५३) हा व्यक्ती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता गावाच्या लगतच्या नाल्यात पुर आल्याने वाहुन गेला.त्याचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावरील हनुमंतखेडे गावाजवळ झुडुपात सापडला. त्याचे शवविच्छेदन कसोदा प्रा.आरोग्य केंद्रात करण्यात आले.
एरंडोल येथे शासकीय विश्राम गृहा समोरील पवारा आदिवासी लोकांच्या झोपड्या पुरात वाहुन गेल्यामुळे सदर २० ते २५ परिवार विना निवारा निराधार झालेले आहेत.त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी न.पा.प्रशासन व सेवाभावी संस्था यांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.नगर पालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा देऊन व काही प्रतिष्ठितांनी प्रत्यक्ष जाऊन या आदिवासी परिवाराला झोपडपट्टी खाली करण्याच्या सूचना केल्या.यात झोपडपट्ट्या वाहुन गेल्या तर यात प्रेमराज रामसिंग बारेलायांचे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले.त्या परिवारातील पाच जन तिन ते चार तास एका काटेरी झाडाचा त्यांनी आधार घेतला.त्यांना दोर टाकुन बाहेर सुरक्षित काढण्यात आले.यावेळी काही युवकांनी व नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी मदत कार्य केले.मुकेश प्रेमलाल बारेला,दुर्गाबाई प्रेमलाल बारेला,रामाबाई बारेला,प्रेमलाल बारेला तर दुस-या झाडावर सीताराम बारेला हा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत होता.त्यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.म्हसावद रस्त्यावरील जुन्या फरशीला तडे गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.स्मशानभूमीची संरक्षक भिंत,कासोदा दरवाज्या नजीकची भिंत,आठवडे बाजारा नजीकची संरक्षक भिंत अंशतः कोसळल्यामुळे हानी झाली आहे.
आठवडे बाजार परिसरातील पुरातन महादेव मंदिराला ४० वर्षानंतर पुराच्या पाण्याने वेढा पडला होता.आठवडे बाजार व बुधवार दरवाज्या समोरचा रस्ता अंजनी नदीचा प्रवाह बनला व त्याच्या काठावर असलेलं मटण मार्केट जवळील घरांमध्ये पाणी घुसून त्यांचे मोठे नुकसान झाले. होता.जवळपास ४० वर्षानंतर अंजनी नदीला मोठा पुर आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.गुरुवारी दुपारी अंजनी धरणाच्या तिन पैकी एका गेटची दुरुस्ती करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विस्तार अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाकडून केराची टोपली

Next Post

निधन वार्ता-हिराबाई यादव

Next Post
निधन वार्ता-हिराबाई यादव

निधन वार्ता-हिराबाई यादव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo