Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अक्षयकुमार जैस्वाल यांच्या सरपंच अपात्रतेच्या निकालास ग्रामविकास मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या न्यायालयाकडून स्थगिती!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
अक्षयकुमार जैस्वाल यांच्या सरपंच अपात्रतेच्या निकालास ग्रामविकास मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या न्यायालयाकडून स्थगिती!!

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्या विरुद्ध म. मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगांव यांनी म. विभागीय आयुक्त नाशिक यांच्या न्यायालयात अपील अर्ज क्रं.5/2023 महाराष्ट्र ग्रा. पं.अधिनियम 1958 चे 39 (1) नुसार सरपंच पद अपात्र करणे संदर्भात अर्ज केला होता.

सदर अपील अर्जामध्ये दि.6-2-2024 रोजी नाशिक आयुक्त यांनी निकाल पारित करून सरपंच पद पुढील उर्वरित काळासाठी अपात्र करण्यात आले होते.

सदर निर्णया विरोधात कायद्याच्या नियमानुसार अक्षयकुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम 1958 चे कलम 39 (3) नुसार दि.8-2-2024 रोजी अपील अर्ज दाखल केला. सदर अपीलाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दि.16-2-2024 रोजी झाली असता, अपील अर्जदार जैस्वाल यांनी स्वतःहा आपली बाजू मांडली. तसेच अपील अर्जातील सामनेवाले सर्व हजर होते.

ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार राज्यमंत्री नसल्याने ग्रामविकास मंत्री मा.गिरीश भाऊ महाजन यांनी सर्व पक्षकारांची बाजू ऐकून त्यांच्या न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केले असता, सदर प्रकरणात अपहार किंवा भ्रष्टाचार झाला नसून कामकाज करतांना अनियमितता झाल्याचे दिसून येते म्हणून वस्तुस्थिती विचारात घेत विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या दि.6-2-2024 रोजीच्या आदेश्यास पुढील आदेशा पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

वरील सर्व बाबी पाहता अक्षयकुमार जैस्वाल यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त नाशिक यांनी दि.6-2-2024 रोजी दिलेला निकाल वस्तूस्थितीला धरून नाही, तसेच बेकायदेशीर असल्याबाबत त्यांनी दिलेल्य प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कारण, दि. 30-1-2024 रोजी मा. विभागीय आयुक्त यांच्या दालनात माझ्या वतीने वकिलांमार्फत अर्जदार यांनी केलेला अर्ज व त्या सोबतचे इतर कागदपत्रे लेखी मागणी केली होती. सदर अर्ज विभागीय आयुक्त यांनी मंजूर करून तशी रोजनाम्यावर उल्लेख ही केलेला आहे.

सदर मागणी नुसार अर्जदारास कागदपत्रे पुरवावे आदेशीत केले.व रोजनाम्यामध्ये पुढील सुनावणी दि.6-2-2024 रोजी ठेवल्याचे रोजनाम्यावर दिसून येते.

परंतु विभागीय आयुक्त यांनी मला कुठलेही काही आरोपपत्र व कागदपत्रे न देता दि.30-2-2024 रोजी सुनावणी न घेता फाईल बंद केली व निकालावर ठेवली. व दि.6-2-2024 रोजी बेकायदेशीर निकाल पारित केला. यानंतर दि.16-2-2024 रोजी माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत बाजू मांडण्यात आली. त्यानुसार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो, व न्यायालयाचे आभार ही मानले. असे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.मा.मंत्र गिरीश भाऊ महाजन यांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णायाचे लोहारा गावातील सरपंच, सतांधारी ग्रा. प. सदस्य व सुज्ञ नागरीकांनी न्यायालयाचे विशेष आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहायक आयुक्त, समाजकल्याण च्या वतीने उडान २०२४ अंतर्गत जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार

Next Post
शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo