Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील

जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) :-  :- जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज  महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, वरील योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे (Fresh) नुतनीकरणाचे (Renewal)  अर्ज भरण्यास दि. 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

                सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत  https;//mahadbtmahait.gov.in  या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी तसेच कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निवृत्ती वेतन धारकाकरिता महतवाची बातमी…

Next Post

जिल्ह्यात आज २९३ कोविड – १९ रुग्णांची नोंद

Next Post
जिल्ह्यात ३३८ कोविड-१९ बाधित रुग्णांची नोंद

जिल्ह्यात आज २९३ कोविड - १९ रुग्णांची नोंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo