Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. २६ : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सी.आय.डी) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Maha Info Corona Website

अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६, ३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायिक अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.

या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ चा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

Next Post

वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरींच्या गाडीची अज्ञातंकडून तोड फोड-पोलिसांकडून तपास सुरू

Next Post
वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरींच्या गाडीची अज्ञातंकडून तोड फोड-पोलिसांकडून तपास सुरू

वरणगाव नगरसेवक राजेंद्र चौधरींच्या गाडीची अज्ञातंकडून तोड फोड-पोलिसांकडून तपास सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d