Wednesday, May 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे इंडियन रेड क्रॉस सोसायटीला दोन लाख रूपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे  इंडियन रेड क्रॉस सोसायटीला दोन लाख रूपयांची मदत

जळगाव, दि. 19 (जिमाका) :- जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या उपायांमध्ये अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचा समावेश आहे.

महसुल विभागाला नेहमी प्रत्येक आपत्ती व संकटकाळात अग्रेसर भुमिका बजवावी लागते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुढे येऊन कुठल्याही परिस्थीतीत जबाबदारी पार पाडावी लागते. आरोग्य विभागाबरोबर सुट्टी न घेता गेल्या 3 महीन्यांपासुन सतत महसुल व पोलीस विभागही रात्रंदिवस अखंडपणे सेवा देत आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेसोबतच सामाजीक बांधीलकी म्हणुन दानशुर व्यक्ती पुढे येऊन मदत केल्यास निश्चीतच थोडया कालावधीत जिल्हा कोरानामुक्तीच्या दिशेने वाटचाल करु शकेल. हे लक्षात घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होवून स्वेच्छेने यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले होते.

कृषि विभागाने हे आवाहन स्वीकारुन कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे यांचे नेतृत्वाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांना अर्सेनिक अल्बम 30 या औषधींच्या निर्मीतीसाठी कृषि विभागाचे अधिकारी व कृषि संलग्न निविष्ठा उत्पादक विक्रेते/संघ यांना प्रेरित केले. यामध्ये जळगाव जिल्हा खते, किटकनाशके, बियाणे डीलर्स असोसिएशनचे, अध्यक्ष श्री. विनोद तराळ व संचालक श्री. शैलेंद्र काबरा यांनी रु. 1 लाख 25 हजार आणि रासायनीक खत उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री. नारखेड व संचालक श्री. छत्रपती वानखेडे यांनी रु. 51 हजार तसेच कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी, यावल श्री. आर. एन. जाधव यांनी 13 हजार 500 रूपये, तालुका कृषि अधिकारी, धरणगाव श्री. अभिनव माळी यांनी 5 हजार रूपये, तालुका कृषि अधिकारी पारोळा, एरंडोल, भुसावळ, श्री. ए. पी. वाघ, कृप/ श्री. ए बी देसले, कृषी अधिकारी चाळीसगाव यांनी प्रत्येकी रु 1 हजार स्वेच्छेने मदत केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग तांत्रिक कर्मचारी संघटना, जळगाव यांनी रु 11 हजार धनादेश देऊन सहकार्य केले.

सदरचा निधी संकलनासाठी कृषी विकास अधिकारी श्री. वैभव शिंदे, मोहीम अधिकारी श्री. महाजन व कृषी अधिकारी श्री. शिपी यांचेही सहकार्य लाभले.

मदतीचा धनादेश संबंधितांनी श्री. गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ५४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d