Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव- जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पितांबर पाटील यांनी केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, जैन, सिख, ख्रिश्चन, पारसी, ज्यू या समुदायातील गरजू विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक, तांत्रिक या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (MBA,MBBS,BAMS,BE, IT) शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2021 -2022 या वर्षासाठी स्विकारली जात आहे. तसेच अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहे. या योजनेचे जास्तीत जास्त अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्हा कार्यालयात संपूर्ण कागदपत्रांसह हे अर्ज जमा करण्यात यावी. अधिक माहिती करीता संबधित जिल्हा कार्यलय व महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करा. तसेच ऑनलाईन अर्ज https://malms.maharashtra.gov.in या लिंकवर करु शकता.

जळगाव जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जळगाव गणपती नगर, अटल हॉस्पिटल जवळ, बाफना स्वाध्याय केंद्राच्या गल्लीमध्ये, पुष्पांजली सोसायटी, मातोश्री इमारत प्लॉट नंबर 5 जळगाव

अधीक माहितीसाठी संपर्क- 07588007560, 09049033424

फॉर्म भरताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत सदरची कागदपत्रे फाईल सोबत जोडून जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे जमा करावे 

1)अर्जदाराचे आधार कार्ड, रहिवासी दाखला. डोमेसाइल सर्टिफिकेट, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, एलसी ची झेरॉक्स , मागील दहावी /बारावी हे शिक्षण झाले आहे असेल त्यांच्या मार्कशीट किंवा इतर कोणतेही शिक्षण असेल त्यांचे मार्कशीट, कॉलेजचे आयडी कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, कॉलेजचे बोनाफाईड , वर्षनिहाय फी चा तक्ता, एसबीसी/ ओबीसी/ मायनॉरिटी मिडत असेल त्याबाबत महामंडळाचा विहित नमुना महाविद्यालयाकडून भरून आणावा

2)वडिलांचे कागदपत्रे वडीलांचे आधार कार्ड, मतदान कार्ड ,पॅन कार्ड, रहिवासी दाखला , राशन कार्डाची कलर प्रत, ओरिजनल उत्पन्नाचा दाखला,

3) जमीनदारांचे कागदपत्रे 1) नोकरदार असल्यास आधार कार्ड, मतदान कार्ड लाईट बिल ची झेरॉक्स, पॅन कार्ड, ज्या विभागास नोकरी आहेत या विभागाचे आयडी कार्ड, मागील तीन महिन्याचा पगाराचा संबंधित विभागाचा दाखला, महामंडळाचे दोन विहीत नमुने,

2) जामीनदार मालमत्ता धारण असेल तर वरील रहिवाशी पुराव्यांसह सातबारा उतारा किंवा नमुना नंबर आठ किंवा सिटीसर्वे चा उतारा व त्याचे दुय्यम निबंधक यांचे शासकीय मूल्यांकन

3)जामीनदार खाजगी व्यवसाय असेल तर वरील रहिवासी पुराव्यांसह पॅन कार्ड, आधार कार्ड, व चालू मागील तीन वर्षांचे आयटी रिटर्न सोबत ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या जागेचा पुरावा शॉप ॲक्ट लायसन्स किंवा व्यवसाय नोंदणीकृत असेल त्यांचा पुरावा व्यवसायिक जागेचे लाईट बिल

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे आयोजीत जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे आयोजीत जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे आयोजीत जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d