Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विधी सेवा महाशिबिराचे आयोजन

मुंबई(प्रतिनिधी)- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कामगार उप आयुक्त, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर कम्युनिटी हॉल, वांद्रे (पुर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.

कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायाधीश श्री. ए. ए. सैय्यद हे होते. कार्यक्रमास न्यायाधीश श्री. आर. डी. धनुका, न्यायाधीश श्रीम. साधना जाधव, न्यायाधीश श्री. व्हि. जी. बिस्ट, उच्च न्यायालय, मुंबई, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, श्री. डी. पी. सुराणा, सदस्य सचिव, महराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी केंद्र शासनाने ऑगस्ट-2021 मध्ये राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांसाठी डाटा बेस तयार करण्यासाठी सुरु केलेल्या ई-श्रम पोर्टल द्वारे कामगारांची नोंदणी करुन, पाच कामगारांना UAN कार्ड मुख्य न्यायाधीश श्री. ए. ए. सैय्यद व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या ठिकाणी कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता ई-श्रम पोर्टलचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी व कामगारांना विविध कल्याणकारी योजनांद्वारे देण्यात येणारे लाभ, घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांची नोंदणी व त्यांना मिळणारे लाभ याबाबतची जनजागृती व माहिती कामगारांना व्हावी याकरिता स्टॉल उभारण्यात आले होते.

या स्टॉलमध्ये उपस्थित कामगारांना मुंबई उपनगरचे कामगार उप आयुक्त श्री. भ. मा. आंधळे व मुंबई शहर कामगार उप आयुक्त निलांबरी भोसले यांनी माहिती दिली.मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी घरेलू कामगार कल्याण मंडळ तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करावी असे कामगार आयुक्तालयामार्फत आवाहन करण्यात आले.

असंघटित क्षेत्रातील कामगार रिक्षावाले, फेरीवाले, मच्छीमार, शेतमजूर, दुधवाले, पानवाले, धोबी, सफाई कामगार, केश कर्तनालय कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार इत्यादी प्रकारचे 300 उद्योगातील व व्यवसायातील कामगारांनी सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 अंतर्गत भविष्यामध्ये विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास सहायक कामगार आयुक्त राजश्री पाटील तसेच सरकारी कामगार अधिकारी स्वरा गुरव हे अधिकारी कामगार आयुक्त कार्यालयातील प्रविण कावळे, महेश पाटील, कैलास मुजमुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये नागरी सुविधा केंद्राचे कर्मचारी तसेच कामगार सुविधा केंद्रातील कर्मचारी यांनीदेखील सहभाग नोंदविला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कारागृहातील बंदीवानांच्या सृजनशीलतेला मिळाले व्यासपीठ -मंत्री छगन भुजबळ  

Next Post

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Next Post
दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d