Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘अहिंसा व विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनवावे लागेल’ -राज्यपाल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
‘अहिंसा व विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनवावे लागेल’ -राज्यपाल

मुंबई(प्रतिनिधी)- जागतिक हवामान बदल तसेच पर्यावरण रक्षणाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आधुनिक परिस्थितीला प्राचीन मूल्यांची जोड द्यावी लागेल, तसेच अहिंसा व विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी भारताला बलवान व सामर्थ्यवान बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.अहिंसा विश्वभारती संस्थेतर्फे अध्यक्ष आचार्य डॉ लोकेश यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त राजभवन येथे शनिवारी (दि. 27) ‘जागतिक आव्हाने व आपली जबाबदारी’ या विषयावर एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मधुर भांडारकर व माजी आमदार राजपुरोहित उपस्थित होते.

भारतात त्याग भावनेला सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळेच देशात संतांचा सर्वाधिक आदर केला जातो. महात्मा गांधी यांनी त्याग व शांतीपूर्ण सत्याग्रहातून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यागामुळे जीवन उन्नत होते, त्यामुळे संतांचे विचार धारण केले पाहिजे. मात्र त्यासोबतच जीवनात आत्मरक्षा, स्वसंरक्षणाची शक्ती असलीच पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

जागतिक हवामान बदल, हिंसाचार तसेच गरिबी ही जगापुढील तीन मोठी आव्हाने असल्याचे नमूद करून अध्यात्म व ऐहिकवादात संतुलन प्रस्थापित केल्यास त्यातून निकोप समाज निर्मिती होईल असे प्रतिपादन आचार्य लोकेश मुनी यांनी यावेळी केले. जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ शासनाने प्रयत्न करणे पुरेसे नाही तर त्यासाठी धार्मिक नेते व सामाजिक संस्थांना देखील पुढे यावे लागेल असे त्यांनी सांगितले.

जल वायू प्रदूषणापेक्षाही समाजात वैचारिक प्रदूषण झाले असून त्यातून तिरस्कार व मतभेद वाढत आहेत. यादृष्टीने सहअस्तित्वाचा तसेच विचारांचा आदर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.भारताने जगाकरिता अहिंसा गुरु व्हावे व सर्व जीवमात्रांना शांती व अभय लाभावे अशी अपेक्षा जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी जैन आचार्य सागरचंद्र सुरीश्वर महाराज यांना अहिंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मधुर भांडारकर, मधू जैन, डॉ गौतम भन्साळी व पत्रकार अभिमन्यू शितोळे यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रस्तावित जागतिक शांती केंद्राच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा

Next Post

मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo