Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिला कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना दिलासा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिला कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना दिलासा

(विषेश प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा निर्णय आज आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिला आहे. कुलभूषण जाधव या प्रकरणामध्ये पाकिस्तानी न्यायालयाने त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे निर्देश आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये भारताची बाजू १५ विरूद्ध १ अशा फरकाने सिद्ध झाल्यामुळे आता या निर्णयाचा पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे. या निर्णयामुळे कुलभूषण जाधवला पाकिस्तानी कोर्टाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या खटल्यामध्ये हरीश साळवे यांनी भारतातर्फे कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली.

दरम्यान, या बाबतीत पाकिस्ताननं केलेले सर्व आरोप खोडून काढत भारताला कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत करण्याचे अधिकार देखील या सुनावणीवेळी देण्यात आले आहेत. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तानकडून मानवी हक्कांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. पाकिस्तान सरकारकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव भारतीय हेर असल्यामुळे त्यांना व्हिएन्ना करार लागू होत नाही असा दावा केला होता. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचा राजनैतिक मदतीचा म्हणजेच कुलभूषण जाधव यांना कौन्सेलर अॅक्सेस देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता कुलभूषण जाधव यांच्या विरोधातला खटला कौन्सेलर अॅक्सेस न घेता चालवला हे सिद्ध होतं. म्हणजेच हा खटला आणि त्याद्वारे दिलेली फाशीची शिक्षा बेकायदेशीर ठरते. व्हिएन्हा करारानुसार अशा कैद्यांना कौन्सेलर अॅक्सेस देणं आवश्यक आहे. पण या करारात तसा अॅक्सेस देण्यात आला नाही. म्हणून या परिस्थितीमध्ये पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कौन्सेलर अॅक्सेस देऊन या खटल्याची पुन्हा सुनावणी घ्यावी लागेल. जर पाकिस्ताननं ते नाकारलं, तर संयुक्त राष्ट्र पाकिस्तानला तसं करायला भाग पाडू शकतं.

एखाद्या परदेशी नागरिकाला एखाद्या देशात अटक होत असेल, तर तो त्या देशाचा नागरिक आहे, तिथल्या वकिलांना त्या देशात जाऊन संबंधित कैद्याला भेटून त्याला कायदेशीर सल्ला आणि मदत करण्याची मुभा मिळते. जर तसं झालं नाही, तर अटक झालेल्या देशातील वकीलही संबंधित कैद्याचं वकीलपत्र घेता येतं.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवंता फाऊंडेशन कडून गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय-डॉ. मोहन देशपांडे

Next Post
लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय-डॉ. मोहन देशपांडे

लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय-डॉ. मोहन देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo