Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज खंडग्रास चंद्र ग्रहण-विषेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
इंटरनेट- सोशल मीडिया एक प्रकारचे व्यसन..?

जळगाव – आज दि १६ जुलै खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. संपूर्ण भारतातून जवळपास 3 तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. मंगळवारी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी हे ग्रहण सुरु होईल व पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे.
चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो,तेव्हा चंद्रग्रहण घडून येते.अशावेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते.पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो.त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते, तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. उद्या भारताबरोबरच, अफगाणिस्तान,तुर्की, युक्रेन, इराण, इराक,सौदी अरब,पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका या देशात सुद्धा हे चंद्र ग्रहण दिसणार आहे.शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे वेध ९ तास आधी सुरु होतात.त्यानुसार उद्या मंगळवार दि १६ जुलै रोजी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी वेध सुरु होणार.चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते,परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही.सूर्य,पृथ्वी,व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते.खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो.
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत.यात शुभ-अशुभ असे काहीही नसते.सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे.या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते.म्हणून मनात कोणतीही भीती अथवा अंधश्रद्धा ठेवून चंद्रग्रहण बघणे टाळू नका.चंद्रग्रहणाचा आनंद घ्या.

मनोज भालेराव (शिक्षक)
मो.८४२१४६५५६१
प्रगती विद्यामंदिर जळगांव

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव ग्रामिण रूग्नालय उप जिल्हारूग्नालयाच्या श्रेणीवर्धन मध्ये समाविष्ट-आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

पत्रकारावर हल्ला प्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल-पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo