Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या पदभरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात 14 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार असून याकरिता 30 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 25 शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या वर्गात साधारण 6000 पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्राचार्य (16), उप-प्राचार्य (08), टी.जी.टी. (इंग्रजी, फिजिक्स, गणित, अर्थशास्त्र, बायोलॉजी, कॉमर्स)(28) आणि पी.जी.टी (इंग्रजी, हिंदी,  गणित, विज्ञान, समाजशास्त्र) (164) अशा एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार आहे. या पदांसाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर करावे.

पदभरतीकरिता होणारी परीक्षा ही तीन तासांची असून ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून 2021 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तसेच ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारणीचे काम सुरू : महापौरांनी केली पाहणी

Next Post

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा – ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने निर्देश द्यावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo