Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

मुंबई-आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज या संदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ’मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेना भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यामागची कारणमीमांसा सांगितली. तज्ज्ञांच्या मदतीनं त्यांनी यावेळी ’आरे’तील जैवविधतेचं सादरीकरणही केलं. ’शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. फक्त ’आरे’मध्ये होणार्‍या कारशेडला विरोध आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. कारशेडला विरोध करण्यामागे कुठलंही राजकारण नाही. एक मुंबईकर व पर्यावरणप्रेमी म्हणून मी ही भूमिका मांडत आहे. मुंबईसाठी मेट्रो आवश्यक आहे. त्यामुळंच मेट्रोच्या कामामुळं मुंबईकरांना त्रास होत असतानाही आम्ही संयमाची भूमिका घेतली. अनेक रस्त्यावर खड्डे पडले, काही वेळा झाडे तोडली गेली. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न असल्यानं शिवसेनेनं विरोध केला नाही. मात्र, ’आरे’तील कारशेड हा विषय वेगळा आहे,’ असं आदित्य म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युतीत अनिल राठोड नकोच : दिलीप गांधींची भूमिका

Next Post

आर्थिक मंदीचा फटका;नोकरी मिळणे कठीण

Next Post
आर्थिक मंदीचा फटका;नोकरी मिळणे कठीण

आर्थिक मंदीचा फटका;नोकरी मिळणे कठीण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo