Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
उडाण फाऊंडेशन, रोटरी स्टार, इनरव्हील क्लबतर्फे १०० शेतकऱ्यांना बियाणे, खत वाटप!

जळगाव, दि.१५ – शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार, रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बाय व्ह्यूतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बियाणे आणि खत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रोटरी क्लब जळगाव स्टारचे अध्यक्ष धनराज कासट, उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, संदीप पाटील, सागर मुंदडा, डॉ.विद्या चौधरी, चेतन वाणी, धर्मेश गादीया, डॉ.महेंद्र माल, नीरज अग्रवाल, चंद्रशेखर नेवे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, कोविडमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. आज आपण सर्व शेतकऱ्यांना मदत करू शकत नसलो तरी ज्यांना मदत होईल त्यांचे आयुष्य काहीसे सुखकर होईल. अडचणीच्या काळात आपण विविध संस्थांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावलो आहेत यातून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे जिल्हाधिकारी म्हणाले.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले की, शेतकरी हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. गरजू शेतकऱ्यांना केलेली मदत नक्कीच त्यांच्या उपयोगी ठरेल आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. रोटरी स्टार, उडाण फाऊंडेशन व इनरव्हीलने पुढाकार घेऊन राबविलेल्या हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधिक्षकांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ५ गावांच्या सरपंच व शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे व खताची बॅग सोपविण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम

Next Post

जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही; आर्थिक आधारासोबत बालकांना भावनिक आधार गरजेचा – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo