Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र मधील छावा ही पुण्यात येणारी भाजप सरकारची महाजनादेश यात्रा रोखणार-मा.अजय पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
उत्तर महाराष्ट्र मधील छावा ही  पुण्यात येणारी भाजप सरकारची महाजनादेश यात्रा रोखणार-मा.अजय पाटील

जळगांव- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करून मा मुख्यमंत्री व भाजप सरकार आपल्या येणाऱ्या निवडनिकी साठी कंबर कसत आहे. जळगांव ,धुळे नाशिक आणि औरंगाबाद येथे या यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले, व यात केलेलं अश्वासन ही जनतेला ऐकायला मिळाली.भाजप सरकार स्वतःच्या पाठीवर हात मारत पाठ थोपटून घेत असल्याची चर्चाही काही पक्षांनी केली आहे.अश्याच प्रकारचे खडे बोल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा धनाजी येळकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाजप सरकार ला सुनावले.फसव्या भाजप सरकार च्या फसव्या महाजनादेश यात्रेचे पुण्यातील आयोजन आम्ही हाणून पाडू,या यात्रेला आम्ही रोखु .या विषयी सविस्तर बोलतांना मा धनाजी येळकर यांनी सांगितले की,सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले, मात्र त्याची अंबलबजावणी आद्यप करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांना शाळेत, कॉलेजात,विविध परीक्षा साठी अजूनही फी सवलत दिली जात नाही.त्या साठी चे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ देखील कर्ज उपलब्ध करत नसून, नावापुरतेच आहे. एकीकडे हमी भाव जाहीर करून देण्यात आला मात्र तो अद्याप देण्यात आला नाही,संपूर्ण कर्जमाफी ची घोषणा देऊनही लाभार्थ्यांना त्या साठी झगडावे लागत आहे. त्याच बरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल गुन्हे अजूनही मागे घेतले जात नाहीत ही परिस्तिथी निंदनीय आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तीन वर्षे उलटूनही अद्याप काम सुरू होत नाही आहे, या उलट महाराष्ट्राची अस्मिता असलेले गड किल्ले भाड्याने देण्याचा जो दुर्दैवी निर्णय घेतला तो संताप जनक आहे. अश्या फसव्या सरकार कडून काढण्यात येणार असलेली फसवी महाजनादेश यात्रा पुण्यात येणार आहे ,या सरकारला वरील सर्व प्रश्न विचारन्यासाठी व धडा शिकवण्या साठी छावा मराठा युवा महासंघ कडून पदाधिकारी व कार्यकर्ते ही महाजनादेश यात्रा रोखणार असल्याचे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक मा.धनाजी येळकर, यांनी सांगितले. तर उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने या महाजनादेश यात्रेला रोखण्यास छावा युवा कार्यकर्ते हजर राहतील असे जिल्हा अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ जळगांव मा अमोलभाऊ कोल्हे, व  उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रमुख मा अजय पाटील यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन कुस्तीपटू विजयी

Next Post

विस्तार अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाकडून केराची टोपली

Next Post
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

विस्तार अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाकडून केराची टोपली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo