Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु;कॉपी मुक्त परीक्षेसाठी कासोदा केंद्र सज्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल-(सागर शेलार)-कासोदा केंद्रात साधना माध्यमिक विद्यालय , हाजी एनएम सय्यद उर्दु हायस्कूल , शहजादि उर्दु हायस्कूल मध्ये उद्या दि. ३ मार्च पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत  मराठी व उर्दु  मेडियम चे एकूण ६८२ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे. डी. १९४४५७ ते डी. १९४६६३ पर्यंत च्या ६८२ विद्यार्थ्यांना एकूण २९ ब्लॉक ची बैठक व्यवस्था करण्यात आली असून, त्यात मराठी माध्यमच्या ३ शाळा आहेत तर २ शाळा उर्दु माध्यमसह एक शासकीय आश्रम शाळा आहेत  त्यात दोन दिव्यांग विध्यार्थी असून त्याची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे. तर पुनरपरिक्षेस मराठी माध्यम चे १६ व उर्दु माध्यम चे ३ विध्यार्थी फेर परीक्षा देत आहेत.  कासोदा केंद्रात गावातील साधना माध्यमिक विद्यालय , कं. न. मंत्री माध्यमिक  विद्यालय , भारती विद्या मंदिर , लिटिल व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, सार्वजनिक माध्यमिक विद्यालयासह परिसरातील निपाने , आडगाव , सोनबर्डी , तळई , जवखेडे, येथील शाळेतील विद्यार्थी आपले दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणार आहेत. पण यात गुणवंत विध्यार्थी घडले पाहिजे म्हणून एसएससी ची  परीक्षा कॉफी मुक्त व्हावी यासाठी  शिक्षण विभाग केंद्रसंचालक  , सर्वच शाळेतील मुख्याध्यापक, पोलीस प्रशासन यांनी आजच उपाययोजना कराव्यात  व परीक्षा केंद्रा बाहेरच् टारगट मुले  ही त्रास देण्याचे काम करीत असतात. यांच्यावर आळा घालण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशन ला २०२० ची एस एस सी ची परीक्षा शर्ती ची ठरणार आहे. म्हणून १०० मीटर अंतराच्या आत कोणीही थांबवू नये. व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे यासाठी सुज्ञ नागरिक , विद्यार्थी , शाळेतील शिक्षक करीत आहे. याकडे  शिक्षण विभागाने व पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होतांना दिसत आहे. तर केंद्र संचालक गोपाल सावंत यांनी गावातील प्रत्येक छोटे – मोठे घरगुती दुकानदार यांना लेखी निवेदन सादर करून पेपर असल्याच्या दिवशी  व त्या वेळे पुरते झेरॉक्स दुकान बंद करण्यात यावे असलयाचे सांगितले असून याकडे लक्ष द्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही ते म्हटले आहे.परीक्षेत बसलेल्या सर्व विध्यार्थ्यांना सत्यमेव जयते, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , साप्ताहिक विचार वैभव , या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फोर्डच्या बी.एस. VI कार्सचे लॉन्चिंग उत्साहात संपन्न

Next Post

मू जे महाविद्यालयात ‘खान्देश सन्मान २०२०’ उत्साहात संपन्न

Next Post

मू जे महाविद्यालयात 'खान्देश सन्मान २०२०' उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo