Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

४० कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनल भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

जळगाव प्रतिनिधी दि. 9 – ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. उद्योग भवनामुळे व्यापाराच्या नोंदणी, परवानग्या आणि इतर औद्योगिक प्रक्रियेतील किचकट कामे सुलभ होतील, तर ट्रक टर्मिनलमुळे माल वाहतूक आणि साठवणीतील अडचणी दूर होतील. या दोन्ही गोष्टींमुळे व्यापारी आणि लघु उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल हे खरोखरच वरदान ठरेल असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी व्यक्त केला. ते 40 कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनल भूमिपूजन प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्रात बोलत होते.

यावेळी खा. स्मिता ताई वाघ व आ. संजय सावकारे यांनी सांगितले की, उद्योग भवनाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे भवन छोटे उद्योग आणि नवीन उपक्रमांना प्रोत्साहन व उद्योजकतेला चालना मिळणार असून बेरोजगारांसाठी उद्योग भवन ठरणार आशेचा किरण..असून रोजगार निर्मितीचे केंद्रस्थान ठरेल.

असे असेल उद्योग भवन व ट्रक टर्मिनल
३८९२ चौ, मी जागेत तीन मजली इमारत उभी राहणार असून यात जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम उद्योग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगीकसुरक्षा व आरोग्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्या इमारती एका छताखाली येणार आहे. तसेच सभागृह, व्यापारी गाळे व कॅन्टीन देखील असणार आहे. २२७०० चौ, मी. जागेत ट्रक टर्मिनल मध्ये १०० ट्रकसाठी भव्य पार्किंग, ऑफीस, गरेज, विश्राम गृह, हायमास्ट व पथ दिवे रस्ते डांबरीकरण , कॅन्टीन पूर्ण भूखंडासाठी संरक्षक भिंत बांधकाम असेल. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उद्योग भवनसाठी २१ कोटी तर ट्रक टर्मिनल साठी १९ कोटी असा एकूण ४० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यात एम. आय. डी. सी. मध्ये केलेल्या सुमारे २०० कोटींच्या कामांचा लेखा – जोखा मांडून उद्योग भवन व ट्रक टर्मिनल कसे असेल याबाबत सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खादी ग्रामोद्योगचे ज्येष्ठ पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी केले. आभार DIC चे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी मानले.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, आ . संजय सावकारे, डी.आय.सी.चे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे, व्यवस्थापक प्रशांत पाटील, एम. आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, लघु भारतीचे अध्यक्ष समीर साने, जिंदा असोसिएशन चे रवी लढ्ढा, मॅट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रायसोनी व इतर सर्व औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा – पद्मश्री इंद्रा उदयन

Next Post

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी;ट्राय सायकल वाटप वितरण प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo