Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे ‘महाबीज’च्या व्यवस्थापकांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम 2021- 22 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलातर्फे (महाबीज) सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याकरीता प्रती एकर 100 रुपये भरणा करुन आरक्षण करणे आवश्यक आहे. रावेर, अमळनेर, जळगाव, पाचोरा येथील सहाय्यक क्षेत्र अधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांच्याशी संपर्क साधत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यावर्षी झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम – 2022 करीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याचा तुटवडा येवू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशान्वये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत जळगाव जिल्ह्यात रब्बी/ उन्हाळी हंगाम 2021-22 करीता प्रमाणीत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम एक हजार दहा हेक्टरवर राबविण्यात येत आहे.

यामध्ये रब्बी / उन्हाळी 2021 या हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन फुले संगम, फुले किमया, एमएयूएस 612, 2003-2, PKVM-8802 आदी वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी 15 एकर क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. एका शेतकऱ्याने कमीत कमी 2 एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बीजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या पायाभूत बियाण्याचा पुरवठा ‘महाबीज’ कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

बियाणे शुल्क शेतकऱ्याने बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात भरणे अनिवार्य आहे. उत्पादित सोयाबीन बियाण्याकरीता महाबीज मुख्यालयाकडून आकर्षक असे खरेदी धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची 100 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पैसे भरुन दहा डिसेंबर 2021 पर्यंत आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : जळगाव, जामनेर, बोदवड, पारोळा : 9624128006. रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर : 9975930014. अमळनेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव : 7083569849. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव : 9922295539.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे -जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

Next Post

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post
महाआवास अभियान यशस्वीतेसाठी  शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य                                                    – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d