Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एमएमआरडीएने उभारलेले कोविड समर्पित आरोग्य केंद्र मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सुपूर्द

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एमएमआरडीएने उभारलेले कोविड समर्पित आरोग्य केंद्र मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सुपूर्द

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एमएमआरडीए मैदानावर कोरोना बाधितांवर उपचारांसाठी सुमारे १ हजार खाट क्षमतेचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र (डी.सी.एच.सी.) उभारले आहे. या केंद्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज (दिनांक १८ मे २०२०) सायंकाळी हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे तसेच पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुख्य सचिव श्री. अजोय मेहता आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इ. सिं. चहल यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. आर. ए. राजीव यांच्याकडून या केंद्राचे हस्तांतरण स्वीकारले.

 मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री. आशिषकुमार सिंह, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीमती सोनिया सेठी, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉक्टर के. एच. गोविंदाराज, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, एमएमआरडीएचे सहआयुक्त डॉ. बी. जी. पवार,  महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ ३) श्री. पराग मसुरकर, एच/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्री. अशोक खैरनार, कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

समर्पित कोविड आरोग्य केंद्राविषयी: 

वांद्रे (पूर्व) मध्ये स्थित या केंद्राची क्षमता १ हजार ०२६ खाटांची आहे. पैकी १८ वॉर्डमध्ये प्रत्येकी २८ खाटा याप्रमाणे ५०४ खाटांसोबत ऑक्सिजन पुरवठ्याचीदेखील सोय आहे. तर ९ वॉर्डमध्ये प्रत्येकी ५८ खाटा अशा ५२२ इतर खाटा आहेत. सोबत १० मोबाईल आयसीयू बेड आहेत. सध्या येथे १३ डॉक्टर, ८ परिचारिका, १४ वॉर्ड बॉय नेमण्यात आले आहेत. तर इतर कामकाजासाठी ७ लिपीकदेखील नेमले आहेत. गरजेनुसार आणखी मनुष्यबळ तैनात केले जाईल.

सव्वा लाख चौरस फूट क्षेत्रफळावर एमएमआरडीएने पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत हे कोविड 19 केअर सेंटर तयार केले आहे. २ मे रोजी काम सुरु होवून ते १६ मे रोजी पूर्णत्वास आले. देशातील हे पहिले असे खुल्या जागेवरील रुग्णालय (ओपन हॉस्पिटल)  आहे. सर्व हवामान परिस्थितीचा विचार करून हे केंद्र उभारले गेले आहे. विशेषत: पावसाळ्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. येथे तीव्र बाधा नसलेल्या (नॉन क्रिटिकल) संक्रमितांवर म्हणजेच सौम्य व मध्यम रोगसूचक रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोना बाधित रूग्णांचा विचार करून या केंद्राची संपूर्ण रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी रूग्णांसाठी निवास, ऑक्सिजन आणि चाचणी घेण्याची सुविधा आहे. स्टोरेज सुविधेसह पॅथॉलॉजी, ईसीजी आणि एक्स-रे मशीनसह देखील सुसज्ज आहे. दररोज सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या रुग्णालयात दिले जाईल. स्वच्छतागृहे, स्नानगृहे यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तर, तैनात डॉक्टरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महानगर आयुक्त श्री आर. ए. राजीव यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ३५० कामगार आणि एमएमआरडीएचे ७० अधिकार्‍यांनी अथक कामकाज करत अवघ्या १५ दिवसात हे कोविड १९ केअर सेंटर उभारले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

Next Post

उस्मानाबाद जिल्हयातील 18 स्वॅबपैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार

Next Post

उस्मानाबाद जिल्हयातील 18 स्वॅबपैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d