Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
एसटी सवलतींचा दोन कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ

मुंबई -(प्रतिनिधी)- गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे,  यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे.
ग्रामीण भागातील मुलींची महाविद्यालयीन शिक्षणातील गळती रोखण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे. या योजनेत 10 वी पर्यंत 19.54 लाख विद्यार्थीनी तसेच 12 वी पर्यंत 24 लाख विद्यार्थीनी लाभ घेत आहेत. विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा एसटी प्रवास सवलत योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सवलत 66.67 टक्के आहे. सध्या या योजनेचे 44 लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे  50 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.


ज्येष्ठांना सवलती


65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी एसटी प्रवास सवलत सर्वसाधारण व निमआराम बसेसमध्ये 50 टक्के इतकी लागू होती. आता वातानुकुलित शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये 45 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचे सध्या 70 लाख लाभार्थी आहेत. रूग्णांना सवलती क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्यात येणार्‍या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सिकलसेलग्रस्त, हिमोफीलीया आणि एचआयव्हीबाधित रुग्ण यांना 100 टक्के प्रवास सवलत देण्यात येते. 100 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास 50 टक्के प्रवास सवलत होती.


आता रेल्वेप्रमाणे 65 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येते. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात 70 टक्के सवलत देण्यात येते. त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या साथीदारास प्रवास भाड्यात 45 टक्के सवलत देण्यात येते.
दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र ते निवासस्थान या दरम्यान प्रवासासाठी 66.67 टक्के सवलत देण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येईल. यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हा रुग्णालयात कमिशनसाठी रुग्णाची आर्थिक लूट

Next Post

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 1 हजार कोटींचे कर्ज

Next Post

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी 1 हजार कोटींचे कर्ज

Comments 1

  1. Anil mishrilal rathod says:
    6 years ago

    Kharvai Kara CM saheb

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d