Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

जळगाव दि.19 प्रतिनिधी -आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.

‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी चित्रप्रदर्शनातील ‘कला आणि माणूस’ या संदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देशदूतचे संपादक हेमंत अलोने, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, हरुन पटेल, ज्ञानेश्वर शेंडे, कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला आणि संस्कृती यांची माणसाच्या जडणघडणीत असलेले महत्त्व याविषयी चर्चा करताना हरुन पटेल यांनी जगण्याचे सौंदर्य निर्माण करते ती कला असे स्पष्ट केले. कलावंत हा नेहमी नवे भावविश्व निर्माण करीत असतो, यातूनही बौद्धिक समृद्धी घडते. माणसाच्या इतिहासाचा आढावा घेतला असता तर मूळ स्वरूपातील जी चित्रकला होती ती गुहेत होती, ती बहरत गेली आणि त्यातूनच कलावंत घडत गेला ,माणुसकीचा संस्कारही वाढत गेला. संस्कृती संस्कारीत करण्यासाठी कला खूप महत्त्वाची आहे ती मानवाला समृद्ध करते आणि बौद्धिक विकासही करते असे हरून पटेल यांनी म्हटले. चित्रकार राजू बाविस्कर यांनी भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कलादालनामध्ये ‘लाॕकडाउन डायरी’ या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली.

कोणत्याही शहराची सांस्कृतिक ओळख ही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने जळगाव शहराची सांस्कृतिक ओळख हे भवरलालजी जैन व अशोकभाऊ जैन यांच्या प्रोत्साहनामुळे होत असल्याचे गौरवोद्गार राजू बाविस्कर यांनी काढणे. ‘लाॕकडाउन डायरी’ या प्रदर्शनाची थीम सांगताना विजय जैन यांनी सामान्य माणसांचा आशावाद असणारी ही कोरोना काळातील चित्रे असल्याचे सांगितले. कला आणि माणूस हे नातं जोडताना हेमंत अलोने यांनी शहराची प्रगती हे कलावंतांवरही अवलंबून असते. यातून माणूस व कलेचे नातं जोडता येऊ शकते. शहर सांस्कृतिक समृद्ध करण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आनंद, समाधान आणि नवनिर्मिती करायचे असेल तर प्रत्येक जण कलाकाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे आणि हे काम जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन आणि आता अशोक जैन हे नेहमी करीत असल्याचे हेमंत अलोने म्हणाले. चित्र सूचणे आणि ते साकारणे हा प्रवास म्हणजे मनाचे प्रतिबिंब होय,असे कलाशिक्षक नितीन सोनवणे यांनी सांगत चित्र साक्षरता विषयावर भाष्य केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी कला आणि संस्कृती या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर संजय चौधरी यांची निवड

Next Post

भारतात वधूचे लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, वैचारीक, शारीरिक पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा.उमेश वाणी

Next Post

भारतात वधूचे लग्नाचे वय २१ केल्याने स्त्रीयांना सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, वैचारीक, शारीरिक पाठबळ मिळणारः एक स्वागतार्ह निर्णय- प्रा.उमेश वाणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo