Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म -रवींद्र चौधरी

जामनेर(प्रतिनिधी)- कष्टकरी शेतमजूर शेतकऱ्यांची सेवा हाच आमचा धर्म असून त्यांच्या समस्या सोडवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे मत खान्देश तेली समाज मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील ओझर येथील नुकसानग्रस्त कष्टकरी शेतमजुरांना दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ओझर या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोरगरीब शेतमजूर कष्टकरी यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प खान्देश तेली समाज मंडळाने केला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज ओझर येथे फराळ वाटप करण्यात आले. ते पुढे म्हणाले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत जाहीर केली पण, ती देखील कमी असल्यामुळे वाढवून मिळावी म्हणून मंडळ प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. ओझर ग्रामस्थांतर्फे सर्व पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,जामनेर पंचायत समितीचे सदस्य रमणदादा चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलिक चौधरी, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील दिलीप चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी,सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, पोलीस पाटील सौ.आनिताताई चौधरी, जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, शेंदुर्णी शहराध्यक्ष सोपान पांडुरंग चौधरी, धुळे तालुका सचिव पंकज संतोष चौधरी, युवक आघाडीचे धुळे जिल्हा सचिव योगेश चौधरी, उपाध्यक्ष नंदू चौधरी, मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी चोपडा समाज सारथी प्रकाश शंकर चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य रमणदादा चौधरी यांनी खान्देश तेली समाज मंडळाने दिलेल्या योगदानाचे व कामगिरीचे कौतुक करून संपुर्ण खान्देशात मंडळाचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून,मंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल व कष्टकरी,शेतमजूर शेतकऱ्यांविषयी सहानभूती दाखवू धुळे येथे आंदोलन करून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार मानले.

यावेळी ओझर गावातील अनेक कष्टकरी शेतमजूर बंधू , माता-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार श्री सुनील तात्या सूर्यवंशी यांनी केले. जामनेर तालुका तेली समाज अध्यक्ष अजय अशोक चौधरी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका सचिव विलास शालिकराम चौधरी, उपाध्यक्ष विशाल चौधरी, खजिनदार वासुदेव चौधरी, शहराध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष अमोल चौधरी प्रसिद्धीप्रमुख सोपान चौधरी, सल्लागार सारंगधर चौधरी, शेंदुर्णी अध्यक्ष सोपान चौधरी ऋषिकेश चौधरी, शुभम राहुल चौधरी गजानन चौधरी चौधरी,अविनाश चौधरी, शुभम चौधरी अरुण चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत प्राप्त -मंत्री छगन भुजबळ

Next Post

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

Next Post
दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d