Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

जळगाव(प्रतिनिधी)- येथील कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती दुकान मालक व दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.याबाबत सविस्तर असे की, कोरोनाबाबत दुकानदार व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कृती फाऊंडेशन, जळगांव शहर महानगरपालिका व गोलाणी मार्केट व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनापासून करावयाचा बचाव हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये कोरोना व्हायरस विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली.

कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, नागरिकांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे सांगितले. त्यानंतर कोरोना आजार लक्षणे व उपाययोजनाच्या माहितीपत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन, फाऊंडेशनच्या कार्यध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, माधवबागचे हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रेयस महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपप्रमुख मानसिंग सोनवणे, व्यापारी संघटना अध्यक्ष पूनम राजपूत, गोलाणी मार्केट सिंधी संगतचे अध्यक्ष जवाहर ललवाणी, सचिव महेश चावला, दिपक कुकरेजा, विजय बोरोले व इतर व्यापारी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी गुरुप्रसाद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात “उपशिक्षणाधिकारी” म्हणून नियुक्ती

Next Post

राहुल चौधरी यांचे “टेस्टमॉझ” द्वारा ऑनलाईन चाचणी निर्मिती या विषयावर मार्गदर्शन; या ऑनलाईन चाचणी द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या घटकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे हे पाहता येईल

Next Post
राहुल चौधरी यांचे “टेस्टमॉझ” द्वारा ऑनलाईन चाचणी निर्मिती या विषयावर मार्गदर्शन; या ऑनलाईन चाचणी द्वारे  विद्यार्थ्यांना आपल्या घटकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे हे पाहता येईल

राहुल चौधरी यांचे "टेस्टमॉझ" द्वारा ऑनलाईन चाचणी निर्मिती या विषयावर मार्गदर्शन; या ऑनलाईन चाचणी द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या घटकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे हे पाहता येईल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo