Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

मुंबई(प्रतिनिधी)- भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अश्यावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला, त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न आहे. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले. नंतरच्या काळात हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात धवल क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. ‘उत्तम खेती, मध्यम बान, निकृष्ट चाकरी, भीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.

कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.यावेळी कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले.दीक्षांत समारोपात एकुण २०८७ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

Team Satymev Jayate

Previous Post

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण; आतापर्यंत 14 लाख 7 हजार 163 लाभार्थ्यांना दिली लस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo