Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केंद्रीय पथकाकडून जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण*

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
केंद्रीय पथकाकडून  जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथील सर्वेक्षण*

जामनेर-(प्रतिनिधी)-कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी च्या उपाययोजनांचा भाग म्हणुन जामनेर तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रिय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले.भारतातील 21 राज्यातील 69 जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण केंद्रीय पथकाकडून करण्यात आले. 20 मे रोजी केंद्रीय टीम जळगांव जिल्ह्यात दाखल झाली.देशात विषाणू तपासणी व संशोधना चे कार्य करणाऱ्या पुणे किंवा चेन्नई येथील इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था सदर सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात रॅपिड टेस्ट व अँटिबॉडी टेस्ट सुद्धा करण्यात येणार आहे.

त्यासाठी गावातून 40 नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले आणि येथून सदर नमुने चेन्नई किंवा पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅब ला पाठवण्यात येणार असून नंतर  त्याचा अहवाल केंद्र सरकार ला देण्यात येणार आहे.

या अहवालानुसार केंद्र सरकार कोरोना आजाराबाबत व इतर उपाययोजना बाबत धोरण निश्चित करणार आहे. जिल्हास्तरावरून सदर सर्वेक्षणासाठी 20 वाहने,आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग, पी.पी.ई. किट व आवश्यक साधन सामुग्री सदर टीमला पुरवण्यात आली. तहसीलदार यांच्याकडून पुरेसे पोलीस संरक्षण, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात आले.

गटविकास अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी  सर्वेक्षणा च्या गावात उपस्थित होते. सदर गावासाठी रवींद्र सूर्यवंशी यांची पथक प्रमुख म्हणून तालुकास्तरावरून नेमणूक करण्यात आली होती.डब्लू .एच.ओ चे एस. ओ. डॉ.प्रकाश  नांदापूरकर यांनी गोराडखेडा येथे भेट देऊन जामनेर टीमचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. केंद्रीय टीमध्ये फिल्ड इन्वेस्टिंगेटर अमित पाटील हे होते.प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनीषा वाकोडे-इंगळे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल वंजारी यांनी सर्व नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले.

सदर सर्वेक्षणासाठी आलेल्या टीमचे जि. प.सदस्य अमितभाऊ देशमुख व वाकडी चे मा. सरपंच  शेखरभाऊ वाणी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सदर प्रसंगी गटविकास अधिकारी डी.एस. लोखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. मनोज तेली,डॉ.योगेश राजपूत,डॉ.विनोद भोई, डॉ.राहुल वाणी,डॉ. विवेक जाधव, डॉ.कुणाल बावस्कर, डॉ.किरण धनगर, भागवत वानखेडे, व्ही. एच.माळी,बशीर पिंजारी, एस.पी.नागरगोजे, सुशीला चौधरी,सी.वी.कराडे,बी.के.साळुंके,दुर्गा जाधव, मीना सावळे, प्रकाश महाले, गौतम लोखंडे, एम.एस.परदेशी,अंबादास  पार्सेवार, ग्रामसेवक  नरेंद्र भावा, तलाठी वैभव बीडके,पोलीस कॉन्स्टेबल संतोष चौधरी,दिनेश मारवडकर,अनिल सुरवाडे, गावातील आशा स्वयंसेविका गीताबाई पाटील, अंगणवाडी सेविका लताबाई देवकर,मदतनीस उज्वला आगळे उपस्थित होते. याप्रसंगी गावातील नागरिक  भारत पाटील,आंनदा पाटील तसेच इतर नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उमरगा मध्ये मुंबईहुन परतलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo