Thursday, April 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे

 

जळगाव दि. 30 ( जिमाका ) केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापारी यांच्याशीच विक्रीचा व्यवहार करावा तसेच बाजार समितीने सुध्दा नवीन व्यापारी केळीच्या व्यापारात येतील यासाठी प्रयत्न करावेत बाजार समितीने परवाना देण्याची पारंपारीक पध्दतील बदल करुन शेतक-यांची फसवणुक होवु नये यासाठी व्यापारी परवाना देतांना परवाना मागणा-या व्यक्तीचे पोलीस व्हेरीफीकेशन तसेच सदर व्यक्तीच्या सिबील स्कोअर्स तपासावे व सदर व्यक्तीच्या व्यवहार करण्याच्या आर्थिक क्षमतेनुसार त्याच्याकडुन अनामत किंवा बँक ग्रॅरंटी घेण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बाजार समितीस केल्या.

कृषि उत्पन्न बाजार समिती, रावेर यांच्या माध्यमातुन आज दिनांक ३०/०७/२०२४ रोजी रावेर येथे केळी लिलाव व स्थिरभावा संदर्भात चर्चा सत्र आयोजित केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक, गौतम बलसाणे यांच्यासह यावल, रावेर, बोदवड, जामनेर, चोपडा या बाजार समितीचे संचालक व परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या चर्चासत्रामध्ये जिल्हाधिकारी यांनी उपस्थित शेतकरी व व्यापारी यांच्याशी थेट संवाद साधला व केळी उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी समजुन घेतल्या. तसेच केळीच्या पिकास स्थिरभाव मिळण्यासाठी दिर्घकालीन तसेच कमीकालावधीच्या अशा दोन प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दिर्घकालीन उपाय योजनेमध्ये शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणंद रस्ते तयार करणे, केळी वाहतुकीसाठी रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देणे तसेच जिल्हयातील केळी उत्पादक शेतकरी यांनी केळीच्या एकाच वाणाची पेरणी न करता केळीचे वेगवेगळया प्रकारच्या वाणांची लागवड करावी असे सांगितले. तसेच केळीवर आधारीत इतर प्रक्रिया उदयोग उभारण्याचे आवाहन केले. बाजार समितीने परवाना धारक व्यापारी यांची माहिती शेतक-यांना होण्यासाठी परवाना धारक व्यापारी याची नावे जाहीर करावीत तसेच त्यांना ओळखपत्र दयावे असे सुचविले.

जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील परवाना देणे बाबतच्या कार्यपध्दतीची माहिती उपस्थित व्यापारी व बाजार समिती सदस्य यांना समजावून सांगितली व बाजार समितीने परवाना देतांना व्यापा-याकडुन त्यांच्या व्यवहाराच्या स्वरुपानुसार बॅक ग्रॅरंटी घेणे बाबत यापुढे दक्षता घ्यावी असे आवाहन केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्कूल बसच्या’ वाहन चालकांनी समजावून घेतले वाहतुकीचे नियम

Next Post

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे अग्रेसर

Next Post
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे अग्रेसर

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे अग्रेसर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d