Thursday, October 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

जळगाव -(प्रतिनिधी )- केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भव्य भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात तीन गटातून 16 संघानी सहभाग नोंदवित भुलाबाईच्या पारंपरिक गीतांना आधुनिकतेची जोड देऊन विविध संदेश देण्याचा प्रयत्न संघांनी केला.
गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कुल प्रांगणात आयोजित भुलाबाई महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य भारती महाजन होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साई प्रसाद पुस्तकालयाच्या शुभांगी आखाडे, निकिता जाधव, पल्लवी निकुंभ ह्या उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण केशव स्मृती प्रतिष्ठानच्या डॉ पूजा महाजन, देवयानी कोल्हे, कोरिओग्राफर सचिन भिडे यांनी केले. सर्वप्रथम गोदावरी फॉउंडेशनच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईच्या मूर्तिचे पूजन करून आरती केली. सावदा येथे तालुकास्तरीय
भुलाबाई महोत्सवाचे यंदाचे दुसरे दुसरे वर्ष असून महोत्सवात विविध गावातील लहान मोठ्या शाळांनी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी सावदा च्या नगरसेविका रेखा वानखेडे, प्रतीक्षा भंगाळे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा बोंडे, फैजपूर च्या नगरसेविका जयश्री चौधरी, रावेर महिला मोर्चा अध्यक्षा आशा कोळी, बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका सारिका चव्हाण, नंदिनी पंत, रावेर च्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, बक्षीस वाटप करण्यात आले. साई प्रसाद पुस्तकालयाचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार रेखा बोंडे यांनी मानले.

असे होते गट

पहिला लहान गट 3 ते 10 वर्षे, मोठा गट 11 ते 16 आणि तिसरा खुला गट 17 वर्षांपासून पुढील मुली, महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल
 लहान गट
प्रथम क्रमांक: मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
द्वितीय क्रमांक: जि. प. शाळा, वडगाव
तृतीय क्रमांक: जि. प. शाळा, वाघोदा
उत्तेजनार्थ: शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, न्हावी

 मोठा गट
प्रथम क्रमांक: डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा
द्वितीय क्रमांक: मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
तृतीय क्रमांक: उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
उत्तेजनार्थ: भारत विद्यालय, न्हावी
खुला गट
प्रथम क्रमांक: भारत विद्यालय, न्हावी
द्वितीय क्रमांक: शिवकन्या मंडळ, साकळी (ता. यावल)

उत्तेजनार्थ: रोकडोबा हनुमान मंदिर मंडळ, कोचूर

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo