Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोकण विभागात मनरेगा अंतर्गत १८ हजार ७५६ मजुरांची उपस्थिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विविध रोजगार योजनेअंतर्गत कामांच्या संख्येत वाढ

नवी मुंबई, दि. 24:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 4 हजार 515 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजुरांची  संख्या 18 हजार 756 झाली आहे. पालघर जिल्ह्यातील कामांना मजुरांचा चांगला प्रतिसाद अशी माहिती  कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.

Maha Info Corona Website

कोकण विभागातील जिल्ह्यांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरु करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजुरांची संख्या अशी –

ठाणे-316 कामे 1 हजार 145 मजूर, रायगड-182 कामे 646 मजूर, पालघर 2 हजार 34 कामे 11 हजार 266 मजूर, रत्नागिरी 1 हजार 155 कामे 3 हजार 398 मजूर, सिंधुदुर्ग 828 कामे 2 हजार 301 मजूर संख्या आहे. यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक कामे सुरु असून इतर जिल्ह्यांपेक्षा मजुरांची उपस्थिती  लक्षणीय आहे. इतर जिल्ह्यांनी देखील कामांची संख्या व मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री. दौंड यांनी यावेळी केले.

सोशल डिस्टंन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तींच्या अधीन राहून कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील  ग्रामपंचायत, कृषि, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना २२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.  यामध्ये रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम,  नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोटया नद्यांवरील मोऱ्यांची दूरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.  पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन  या कामांची संख्या  वाढविण्यात आली आहेत.  मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम) या योजनेअंतर्गत विविध विभागांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या वाढत्या कामांमुळे लॉकडाऊनच्या काळात बिघडलेले मजुरांचे आर्थिक गणित सुरळीत होण्यास मोठी मदत होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पोलीस निरीक्षक यांच्या दबंगगिरी मुळे नागरिकांमध्ये घबराट

Next Post

जामनेर शहर होमीओपॅथिक व पुष्पा मेडीकल यांच्या कडुन रोगप्रतिकार औषधांचे वितरण

Next Post
जामनेर शहर होमीओपॅथिक व पुष्पा मेडीकल यांच्या कडुन रोगप्रतिकार औषधांचे वितरण

जामनेर शहर होमीओपॅथिक व पुष्पा मेडीकल यांच्या कडुन रोगप्रतिकार औषधांचे वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo