Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी
बालविकास मंत्री ना.यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन

रावेर, (प्रतिनिधी)- पत्रकार हा देशाची ताकत असून लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही मध्ये महत्वपूर्ण कार्य पत्रकारांचे असते. कोरोना काळातही पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टींची मांडणी ही पत्रकार योग्य पद्धतीने मांडत असतात. आणि मांडायला ही पाहिजे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता.रावेर येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मंत्री ना. यशोमती ठाकूर बोलत होत्या.

पत्रकार जीवन गौरव व मुकनायक पुरस्काराने सन्मानि

पत्रकार दिलीप वैद्य रावेर व सुरेश जगन्नाथ पाटील यांना जीवन गौरव तर मूकनायक पुरस्कार पत्रकार देवलाल पाटील व दत्तात्रय पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पत्रकारांना हेल्मेट वाटप

यावेळी उपस्थित २२५ पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात आले प्रतिनिधीक स्वरूपात मंत्री ना.यशोमती ठाकूर व आमदार शिरीषदादा चौधरी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती…

यावेळी कार्यक्रमास आ.शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, विनायकराव देशमुख, अभय छाडेज, डॉक्टर उल्हास पाटील जळगाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि प सदस्य सुरेखा पाटील, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी,ग्रामीण जिल्हाकार्यध्यक्ष दीपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नजनीन शेख, महानगध्यक्ष कमलेश देवरे,जिल्हा सहसंघटक चेतन निंबोळकर,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, धरणगाव तालुकाध्यक्ष गोपाल सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी अबरार मिर्झा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे, शरद कुलकर्णी, कमलेश देवरे यांनी केले. आभार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे ,उपाध्यक्ष संतोष नवले ,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सल्लागार सद्दाम पिंजारी, महेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

Next Post

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

Next Post
‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo