Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख

करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आहे. ही भिती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करा अशा सुचना मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांनी दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. करोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त श्री आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री शेख यांनी जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डँशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करुन द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करुन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा.करोना सारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल मीडियातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या असेही ते म्हणाले.

एखादी व्यक्ति परदेशातून आल्यानंतर त्यासाठी आयसोलेशन व कोरेनटाईन कक्ष तयार ठेवा. नव्याने ऊभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देणौयात यावा अशा सुचना श्री शेख यांनी केल्या.

जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व उपाययोजनांची माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Next Post

राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता

Next Post
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता

राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यास मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo