Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या सेवा घेता येणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु

जिल्ह्यात प्रशिक्षण घेतलेले 584 उमेदवार

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 – नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील बेडसाईड असिस्टंट-90, नर्सिंग आईज-427, तर फार्मसी असिस्टंट-67 असे एकूण प्रशिक्षित 584 उमेदवारांची सेवा घेता येणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागांमार्फत कौशल्य विकास संबंधित सर्व योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी या राज्यस्तरीय नोडल एजन्सी मार्फत राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास योजनेमधुन विविध अल्प मुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांध्ये राज्यातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगारक्षम बनविणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत Medical & Nursing आणि Helth Care Sector मध्ये Bedside Assistant, Nursing Aies, General Duty Assistant, Laboatory Assistant तसेच Pharmacy Assistant या अभ्यासक्रमांमध्ये आजतागायत जळगाव जिल्ह्यातील 584 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीतील देशभरातील नोव्हेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरील ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेवून केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 584 पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींच्या सेवा अत्यंत उपयोगी ठरणार आहेत.
नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून ज्या विविध उपाययोजना अंमलात आणल्या गेल्यात. त्याचाच एक भाग म्हणून पॅरामेडीकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 584 उमेदवारांच्या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे दीपेंद्र सिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांनी एका शासकीय पत्रकान्व्ये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘जस्ट अ स्लॅप’.. पर नही मार सकता वो

Next Post

का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर घुले यांचा पक्ष्यांसाठी उपक्रम

Next Post
का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर घुले यांचा पक्ष्यांसाठी उपक्रम

का.ऊ.कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर घुले यांचा पक्ष्यांसाठी उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo