Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 10: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी  कोविड-19 ची  नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे  विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी भेट देऊन कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत संस्थेच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेतली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.प्रिया अब्राहम, शीतज्वर विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा पोतदार, वैज्ञानिक डॉ. मनोहर चौधरी, डॉ. सुमित भारद्वाज आदी उपस्थित होते. 

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 नमुना तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच नमुना तपासणीचे काम करत असताना योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. प्रयोगशाळांसाठी  पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक ते वैद्यकीय साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याकरिता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. म्हैसेकर यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या नमुना तपासणीबाबतची माहिती घेतली.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील कोविड-19 ची नमुना तपासणी  करणाऱ्या प्रयोगशाळेची पाहणी डॉ.म्हैसेकर यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला शौचालयत;कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार समोर

Next Post

जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post
जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी ११४ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo