Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे

मुंबई (प्रतिनीधी)- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाचा परिणाम कमी होतांना दिसत नाही ,  सगळ्यात जास्त प्रभाव हा महाराष्ट्रात मुंबई,पुणे व इतर महानगर क्षेत्रात झालेला पहायला मिळालेला आहे,अश्या अवस्थेमध्ये आपलयाला विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा घेता येणे शक्य नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी हे परीक्षार्थी असणार आहेत जो पर्यंत सध्याची परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही परीक्षा घेऊ नये किंवा आम्ही काही पर्याय  मान राज्यपाल, मान. मुख्यमंत्री,  मान. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, मान. वैद्यकीय शिक्षण मंत्री व तसेच सार्वजनिक विद्यापीठाचे कुलंगरू यांस ई-मेलद्वारे निवेदनातून  मांडले आहेत व आमचे हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कारवाहीस पुढे पाठवलेले आहे. आम्ही आपले लक्ष या बाबीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत की चीनच्या वुहानमध्ये परिस्थिती नियंत्रणात यायला जवळपास ४ महिन्याचा कालावधी लागला व माहे एप्रिलमध्ये परिस्थिती आटोक्यात आली त्यानुषंगाने जर आपण विचार केला  , तर आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जून पर्यंत वाट पाहावी लागेल किंबहुना आपण तसे प्रयत्न देखील सुरु केलेले असावेत ,  तोपर्यंत आपण विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु करणे उचित होणार नाही , जरी आपण लॉकडाऊन उघडले तरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी धोका पत्करणे हे जोखमीचे ठरेल  , म्हणून पुढील काही महिने सामाजिक अंतराचे (social distancing) अतिशय काटेकोरपणे पालन करणे अतिआवश्यक आहे. असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पर्याय १.- पदवीधर वार्षिक परीक्षा पॅटर्न – ज्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या त्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात याव्यात व त्यांचे निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घोषित करावे जेणेकरून ते राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर परीक्षेसाठी पात्र ठरतील.- पदवीधर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – एप्रिल, मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा या सर्व परीक्षा हिवाळी सत्राच्या परीक्षेसोबत एकत्र घेण्यात याव्यात आणि ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्या विषयात सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत.- पदव्युत्तर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा या सर्व परीक्षा हिवाळी सत्राच्या परीक्षेसोबत एकत्र घेण्यात याव्यात आणि ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता त्या विषयात सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत. 

पर्याय २.- पदवीधर वार्षिक परीक्षा पॅटर्न – विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या २ वर्षाच्या गुणवत्तेची सरासरी काढून त्या आधारावर शेवटच्या वर्षाची परीक्षा न घेता त्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील.

– पदवीधर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टरपॅटर्न – एप्रिल, मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा न घेता अगोदरच्या सेमिस्टरच्या आधारावर सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरतील. ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावी. (उदाहरण – सेमिस्टर १,३ आणि ५ गुणांच्या आधारावर सेमिस्टर २, ४ आणि ६च्या परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत.)

– पदव्युत्तर उन्हाळी परीक्षा, सेमिस्टर पॅटर्न – मे आणि जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा न घेता अगोदरच्या सेमिस्टरच्या आधारावर सरासरी गुण प्रदान करण्यात यावे जेणेकरून ते पीएचडी अभ्यासक्रम आणि पीएचडी प्रवेश परीक्षा प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. ज्यांना ATKT आहेत अश्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात यावी. 
(उदाहरण – सेमिस्टर १ आणि ३ गुणांच्या आधारावर सेमिस्टर २, आणि ४ च्या परीक्षेसाठी सरासरी गुण प्रदान करण्यात यावेत) 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

Next Post

जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

Next Post
जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d