Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोव्हिडं नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोगस व खाजगी डॉक्टरवर कठोर कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोव्हिडं नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोगस व खाजगी डॉक्टरवर कठोर कारवाई

जामनेर-(प्रतिनिधी) – तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत होती.यामध्ये काही कोरोना रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला होता.सदर मृत्यूचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ची स्थापना केली होती. समितीच्या सर्वेक्षणातुन असे लक्षात आले की कोरोना चाचणी न करता स्थानिक पातळीवर टायफाईड सांगून अधिक प्रमाणात सलाईन लावण्यात आल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला. सदर घटनेची दखल घेऊन तहसीलदार यांनी खाजगी डॉक्टर व लॅब यांना टायफाईड च्या रुग्णाची आर टी पी सी आर तसेच अँटीजन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


सदर नियमांचे पालन काही ठिकाणी होत नाही व काही पॉझिटिव्ह रुग्णांना काही डॉक्टर कोव्हिडं सेंटर ची परवानगी नसतांना अधिक प्रमाणात सलाईन लावत असल्याची माहिती समोर आली.
या माहितीच्या आधारे आज तळेगांव येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी जे. व्ही.कवळदेवी यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय पथकाने भेट दिली.


पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मनोज तेली,ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे, कक्षाधिकरी के.बी.अण्णा पाटील,तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी, आरोग्य सेवक एस.बी. सुर्यवंशी, आरोग्य सेविका दुर्गा जाधव,आशा स्वयंसेविका गीता माळी, रंजना कोळी वाकडी यांचा समावेश होता. पथकाने अचानक भेट दिली असता आढळून आलेल्या अनियमिततेबाबत त्यांना नोटीस बजाबण्यात आल्या. यामध्ये प्रफुल्ल बोहरा व संतोष पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही.डॉ. स्वप्निल पाटील यांच्याकडे कोणतेही रेकॉर्ड, आवश्यक ते परवाने आढळुन आले नाही तसेच कोरोना चाचणी न करता केवळ टायफाईड ची चाचणी करून अधिक प्रमाणात सलाईन लावत असल्याचे आढळून आले.
प्रशासकीय बाबी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई दाखल करण्याची प्रकिया पूर्ण करण्यात येईल असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार

Next Post

ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू जिल्ह्यात काय राहणार सुरु, काय बंद : जाणून घ्या

Next Post
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू;दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू जिल्ह्यात काय राहणार सुरु, काय बंद : जाणून घ्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo