Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क.ब.चौ.उमवि व केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या माध्यामतून बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स शिवणकला अभ्यासक्रम प्रारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
क.ब.चौ.उमवि व केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या माध्यामतून बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स शिवणकला अभ्यासक्रम प्रारंभ

जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मान्यतेने बेसिक आणि अॅडव्हान्स शिवणकला अभ्यासक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ प्रिती अग्रवाल, रोटरी क्लब ऑफ ईलाईट चे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव वैजयंती पाध्ये, सेवावस्ती विभाग प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक जोशी, प्रकल्प सहप्रमुख मनिषा खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हरिविठ्ठल नगर येथे करण्यात आला.

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याने विद्यापीठामार्फत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असल्याचे सौ मनिषा खडके यांनी सांगितले. बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स शिवणकला अभ्यासक्रम ३ महिन्याचा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठाना सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असते. विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचू शकत असल्याचे सांगितले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना विविध आस्थापना मध्ये व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

जळगाव शहर व परिसरातील गरजू व शिवणकाम शिकू इच्छिणाऱ्या महिलांनी प्रवेशासाठी सेवावस्ती विभाग व्यवस्थापिका स्नेहा तायडे मो. ७७१९० ५५८१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नशिराबाद येथे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

Next Post
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo