Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खात्यातून काढले १ लाख, मजूर गेला तुरुंगात; जाताना थेट पीएम मोदींचं नाव घेतलं; प्रकरण काय?

Desk Team by Desk Team
29/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

बँक खात्यातून १ लाख रुपये काढल्याप्रकरणी पोलिसांनी विडी मजुराला अटक केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून मजुराला बेड्या ठोकल्या. विडी मजुराला २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रांची: झारखंडमध्ये विडी मजुराच्या बँक खात्यात १ लाख रुपये आले. मजुराचा आधार नंबर चुकून एका महिलेच्या एका बँक खात्याशी लिंक झाला होता. मजूर बँक खात्यातून पैसे काढून खर्च करत होता. २ वर्षांत त्यानं १ लाखाहून अधिक रक्कम काढली. महिलेला याबद्दल समजताच तिनं याबद्दलची तक्रार बँक व्यवस्थापकाकडे केली.
विडी मजूर असलेल्या ४२ वर्षीय जीतराय सामंत यांना २४ मार्चला पोलिसांनी अटक केली. खात्यातून पैसे का काढले, याबद्दल सामंत यांना विचारणा करण्यात आली. ‘मला वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता मी ते पैसे परत करू शकत नाही. मी आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही,’ असं सामंत तुरुंगात जाताना म्हणाले.झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात ही घटना घडली. बँक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणे जीतराय सामंत यांचं आधार कार्ड एका महिलेच्या खात्यासोबत लिंक झालं. जीतराय कॉमन सर्व्हिस सेंटरला गेले. आपल्या आधारला लिंक असलेल्या खात्यात पैसे असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर सामंत या खात्यातून पैसे काढू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बँक कर्मचारी या मजुराला पैसे काढण्यात मदत करत होता.ज्या महिलेच्या खात्याला सामंत यांचं आधार कार्ड लिंक झालं होतं, तिचं नाव लागुरी आहे. आपल्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचं तिच्या लक्षात आलं. गेल्या सप्टेंबरमध्ये तिनं झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांकडे याबद्दल तक्रार केली. व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं. यानंतर अधिकाऱ्यांनी शोध घेतला आणि सामंत यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. सामंत पैसे देण्यास असमर्थ होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
बँक अधिकारी आपल्याला मानसिक त्रास देत आहेत. माझ्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामंत यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्र लिहून केली. ‘करोनाची पहिली लाट आल्यावर देशात लॉकडाऊन लागू झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी बँक खात्यात पैसे जमा करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे मी बँक खात्यातील पैशांची माहिती घ्यायला बँकेत गेलो. त्यावेळी खात्यात १ लाख असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी २-४ महिन्यांमध्ये गरजेनुसार पैसे काढले,’ असं सामंत म्हणाले.
Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वाचन , सातत्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाडस हे यशस्वी होण्याचे सूत्र

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d