Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशातील वहीगायन लोक कलेच्या राजमान्यते साठी विधान सभेत आवाज उठवणार -आ.किशोर पाटील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
खान्देशातील वहीगायन लोक कलेच्या राजमान्यते साठी विधान सभेत आवाज उठवणार -आ.किशोर पाटील

राज मान्यता मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही -विनोद ढगे

पाचोरा(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात व खांदेशातही अनेक लोककला लोकप्रिय असल्या तरी केवळ खांदेशातच साजरा होणाऱ्या कानुबाई उत्सवाच्या वेळेस खास करून गायला जाणाऱ्या वहिगायन या लोककलेला राजमान्यता मिळावी जेणेकरून ही लोककला जिवंत राहील अशी अपेक्षा खान्देश लोककलावंत विकास परिषदे चे अध्यक्ष विनोद ढगे यांनी व्यक्त केली. नगरदेवळ्यात आयोजित वहिगायन कलावंतांचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

नगरदेवळा येथे खान्देश लोककलावंत विकास परिषद जळगांव व साई शक्ती वही मंडळ,नगरदेवळा आयोजित खांदेशातील वहिगायन लोककलावंतांचा विभागीय १५ वा मेळावा दिनांक २८ नोव्हेंबर रोजी शेकडो लोककलावंतांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगांव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, महिला सरपंच सौ.प्रतिक्षा काटकर, स्वागताध्यक्ष लोकशाहीर शिवाजीराव पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे जळगांव जिल्हाध्यक्ष विनोद ढगे हे उपस्थित होते.

शाहीर शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लोककलावंतांच्या समस्यांना शासन स्तरावर नक्कीच मांडले जाईल व वहिगायन या कलाप्रकारास राजमान्यता मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी विधानसभेत आवाज उठवु तसेत पाचोरा येथे तालुक्यातील लोककलावंतांच्या कला सादरीकरणासाठी येण्याजाण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून पाचोरा शहरात लवकरात लवकर लोककलाभवन निर्मिती साठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले.

लोककलेच्या राष्ट्रीय निवड समितीवर कार्यरत नगरदेवळा येथील शाहीर शिवाजी पाटील यांचे राहते घर पावसात पडून ते बेघर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन शाहीर शिवाजी पाटील यांचे घर शासकीय मदतीतून किंवा आमच्या मित्रपरिवाराच्या मदतीतून लवकरच बांधून देऊ असा विश्वास आमदार पाटील यांनी दिला. सरपंच सौ.काटकर यांनी वहिगायन या कलेमुळेच कानबाई उत्सवात खरी रंगत निर्माण होत असते असे सांगितले.

दिवसभराच्या या कार्यक्रमास उपस्थित वहिगायन मंडळांनी आपापल्या कला सादर केल्या व प्रत्येक मंडळास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन संजीव बावसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर महाजन, दिपक पाटील, किरण पाटील, भरत चौधरी, गोरख महाजन, शुभम शेलार, गजानन तावडे, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, कैलास महाजन, भागवत महाजन, बबलू महाजन, सागर पाटील, संतोष महाजन, सीताराम महाजन यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरोग्य सुविधा मुबलक ठेवा -जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू -अमोल शिंदे

Next Post
शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू -अमोल शिंदे

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू -अमोल शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d