Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खावटी योजनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खावटी योजनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा

पुणे(प्रतिनिधी)- कोविडसंकट काळात शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी ‘खावटी अनुदान योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटूंबाना प्रति कुटूंब एकूण २ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यापैकी २ हजार रुपये पात्र लाभार्थी कुटूंबाना बँक खात्यात ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) माध्यमातून देण्यात येत आहेत.

उर्वरित रु. २ हजार किंमतीच्या किराणा वस्तू देण्यात येत आहेत. यामध्ये १८ किलो धान्य आणि १ लिटर शेंगदाणा तेलाचा समावेश आहे.शासन निर्णयानुसार मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी जमातीची सर्व कुटुंबे, परितक्याए , घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब आणि वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबांचा खावटी अनुदानासाठी समावेश करण्यात आला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव अंतर्गत २३ आश्रमशाळा, ९ अनुदानीत आश्रमशाळा आणि २४ शासकीय वसतीगृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्कालीन प्रकल्प अधिकारी पंढूरे आणि विद्यमान प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रमपूर्वक सर्वेक्षण आणि नियोजन करून लाभार्थ्याच्या घरापर्यंत अन्नधान्य कीट पोहोचविले. त्यासाठी स्वतंत्र खावटी कक्ष तयार करण्यात आला होता. मोहिम स्तरावर हे काम करण्यात आल्याने लाभार्थ्यांना तात्काळ मदत देणे शक्य झाले.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येऊन जिल्ह्यातील ११ हजार ९९५ लाभार्थ्यांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. यात आंबेगावमधील २३५९, बारामती १३६, भोर २३०, दौंड ११८, हवेली ५४९, इंदापूर १८०, जुन्नर ३३९१, खेड १९१०, मावळ ११८७, मुळशी ६८७, पुणे शहर ४९, पुरंदर ८४, शिरूर ९५३ आणि वेल्हे तालुक्यातील १६२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर ११ हजार ९१८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २ हजार रुपयांप्रमाणे २ कोटी ३८ लाख ३६ हजार रुपये डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहेत.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अरुणा घोडेकर, सुरेश दुरगुडे, विष्णू साखरे, विपुल टकले, विजया बोऱ्हाडे व अनिता करंजकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे.कोविड संकट काळात अनेक कुटुंबांसमोर रोजगार गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना आदिवासी बांधवांना खावटी अनुदानामुळे संकटातून सावरण्यास मदत झाली आहे. संकटकाळात मिळालेली मदत त्यांच्यासाठी महत्वाची ठरली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे न येण्याबाबत आवाहन; ‘कोविड’ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद

Next Post

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे संस्थांना आवाहन

Next Post
स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे संस्थांना आवाहन

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे संस्थांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo