Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

जळगाव- (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात परमानंदाची संकल्पना विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी संबंध उलगडण्यात आला.

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये अध्यात्मिक व योगशास्त्रीय पंचकोशातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोषाची तोंड ओळख करून देण्यात आली. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची कार्यपद्धती त्यांचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. आनंद मिळविण्यासाठी अष्टांग योग व दासबोधात समर्थ रामदासांनी मांडलेली नवविधाभक्ती कशी उपयुक्त ठरते यावरही प्रकाश टाकण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, आपल्या कामातील आनंद मिळविला पाहिजे, आपल्या सोबत इतरांनाही आनंद घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी केले. संस्था पीस वॉक, नेचर वॉक, बर्ड वॉचचे नियमितपणे व वेगवेगळ्या प्रसंगी आयोजन करीत असते. डॉ. अश्विन झाला यांनी पंचमहाभूतांचे मानवी जीवनाशी संबंध व त्याचे महत्त्व थोडक्यात विशद केले. या पीस वॉकमध्ये ५५ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“जलसेवेतून जनसेवेचा वसा – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथिल 30 कोटींची ऐतिहासिक योजना पूर्णत्वास”- पाळधीतील जलक्रांती – वचनपूर्तीचा आदर्श

Next Post

मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात महिलेवर दुर्बिणीद्वारे जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी;गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo