Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गुणवंत खेळाडुंसाठी आर्थिक सेवावृत्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका) दि. 16 – भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे आणि सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे.

            ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.  योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार)  स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच 30 वर्षे किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख यापैकी नंतरच्या दिवसापासून पेन्शन देय असेल आणि त्याच्या / तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील.

ऑलिम्पिक  किंवा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्राविण्यधारक खेळाडूस 20 हजार, सुवर्ण पदक विश्वचषक किंवा विश्व अजिक्यपद स्पर्धेसाठी (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धेसाठी (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार 14 हजार,  कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकासाठी 14 हजार आणि कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्समधील रौप्य व कास्य पदकासाठी 12 हजार रुपये दरमाह मानधन रक्कम असेल.

            दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिक्यंपद स्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहील. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा आहे. विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव अथवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरी आवश्यक आहे.  याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.   https://www.yas.nic.in/sports/scheme-sport-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नागरी अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी, शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा विचार – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post

रोहयोसाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना सहयोगी संस्थाम्हणून अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

रोहयोसाठी नोंदणीकृत सामाजिक संस्थांना सहयोगी संस्थाम्हणून अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo