Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गृहमंत्र्यांची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा घेत कैद्यांशी साधला संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
गृहमंत्र्यांची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा घेत कैद्यांशी साधला संवाद

नागपूर, दि. 4:कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.  या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलीस उपायुक्त विनिता साहू यावेळी उपस्थित होते.

नागपूर कारागृहाची क्षमता 1800 असून सध्या कारागृहात 1750 कैदी आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी  कारागृहात शक्य त्या सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अंडर ट्रायल व सात वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत राज्यात असलेल्या 37 हजार कैद्यांपैकी 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

कोरोनाचा शिरकाव कारागृहातही झाला असून राज्यात 411 कैदी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी 281 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे  162 कारागृह अधिकारी – कर्मचारी यांनासुध्दा कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 90 अधिकारी कर्मचाऱ्यांना उपचारार्थ सुटी देण्यात आली आहे. नागपूर कारागृहात 41 कैदी व 56 अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर क्वारंटाईन केंद्रात उपचार सुरु  आहेत.

कारागृह प्रशासनाने राज्यातील 27 जिल्ह्यात 37 तात्पुरते कारागृह उभारले असून त्या ठिकाणी 2665 कैद्यांना ठेवण्यात आल्याची माहिती श्री. रामानंद यांनी दिली. या भेटीत गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला. कारागृहातील बंदिवानाच्या आरोग्य तपासणीसाठी पाच डॉक्टरांची चमू असून नियमित तपासणी व स्क्रिनिंग करण्यात येते. असेही कारागृह अधीक्षकांनी सांगितले.  लॉकडाऊन काळात नागपूर कारागृहातील कैद्यांनी 70 ते 80 हजार कापडी मास्क तयार केले असून, मास्कच्या विक्रीतून 8 लाख रुपयाचे उत्पन्न झाल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले. बंदिवानाच्या या कार्याची गृहमंत्र्यांनी प्रशंसा केली.          

यावेळी वरिष्ठ कारागृह अधिकारी विकास रजनलवार, दयानंद सोरटे व आनंद कांदे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना व पावसाळ्यातील आजारांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Next Post

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

Next Post
कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo