Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात “साधनाई स्नेहसंमेलन-२०२०” उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात “साधनाई स्नेहसंमेलन-२०२०” उत्साहात संपन्न

भडगाव – (प्रतिनिधी) – येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव संचलीत, गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथे साधनाई संमेलन २०२० विद्यार्थ्यांच्या प्रचंड अशा उत्साहात पार पडले.
संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्या हस्ते पार पडले,कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सभापती विकास पाटील,भडगाव पंचायत समिती सभापती हेमलता पाटील,अव्वर सचिव प्रशांत पाटील,दुध फेडरेशन संचालिका पुनमताई पाटील,गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी,स्थानिक शाळा समिती चेअरमन ओंकार पाटील,युवराज पाटील,संजय पाटील आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम दैनिक सकाळ तर्फे “अचिव्हर्स अॉफ महाराष्ट्र ” पुरस्कार प्राप्त नानासाहेब प्रतापराव पाटील यांचा सत्कार प्राचार्य आर.एस.पाटील यांच्याहस्ते पार पडला.त्यापाठोपाठ लगोलग दुसऱ्यांदा भडगाव पंचायत समिती सभापती बिनविरोध म्हणून निवड झालेल्या सौ.हेमलता पाटील यांचा तसेच राष्ट्रीय कुराश स्पर्धेत कांस्यपदक पटकाऊन महाविद्यालयाचे नाव मोठे करणाऱ्या कु.नेहा गोविंद महाले,विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेल्या गणेश महाजन यांचा विशेष सत्कार नानासाहेब प्रतापराव पाटील तसेच इतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,माया मराठे,अरविंद देसले आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
उद्घाटनानंतर लागलीच साधनाई स्नेहसंमेलनास सुरुवात करण्यात आली,चार तास चाललेल्या ह्या रंगारंग कार्यक्रमात संस्थेच्या कोळगाव येथील सर्वच शाखातील म्हणजेच न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तसेच कला महाविद्यालयाच्या २०० ते २५० विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक महोत्सवाद्वारे आपली कला सादर केली.यावेळी विद्यार्थ्यांनी गीत गायन,समुह गीते,एकल नृत्य,समूह नृत्य,लावणी, गरबा, लोकगीत, एकपात्री नाटिका,समाज प्रबोधनपर नाटिका आदि प्रकार सादर करुन उपस्थित प्रेक्षक, पालक तसेच मान्यवरांची दाद मिळवली. कार्यक्रमास जवळपास साडे तीन हजार प्रेक्षक उपस्थित होते,प्रेक्षकांनी तसेच प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रचंड अशी दाद देत जागीच रोख बक्षीसेही दिली.
कार्यक्रमाची सूत्रे आबासाहेब कोळगाव कर, एस.ए.वाघ, चेतन भोसले, योगेश बोरसे, सोनाली सोनवणे,पी.यु.पाटील आदिंनी यशस्वीपणे सांभाळली तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ कला महाविद्यालयाच्या, यशवंतराव चव्हाण मुक्त महाविद्यालयाच्या प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिरात साबण निर्मिती कार्यशाळा

Next Post

विझता जीवनज्योत….?-कवियत्री-शितल शांताराम पाटील

Next Post

विझता जीवनज्योत….?-कवियत्री-शितल शांताराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo