Wednesday, April 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“ग्राम सडक योजना कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2025
in माहितीचा अधिकार २००५, विशेष
Reading Time: 1 min read
Private:

नंदुरबार – (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय, नंदुरबार येथे माहितीचा अधिकार अधिनियम- २००५ अंतर्गत दिनांक २३  जून २०२५ रोजी ॲड.दिपक सपकाळे यांनी दाखल करण्यात आलेल्या अर्जास संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती पुरवून कायद्याच्या तरतुदींना हरताळ फासल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सदर प्रकरणात, अर्जदाराने मागितलेल्या माहितीस जनमाहिती अधिकाऱ्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. यानंतर, अर्जदाराने दिनांक – ०३/०७/२०२५ रोजी कार्यकारी अभियंता तथा प्रथम अपील अधिकारी ग्राम सडक योजना कार्यालय नंदुरबार यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रथम अपील अधिकाऱ्यांनी दिनांक – २४/०७/२०२५ रोजी प्रथम अपील सुनावणी आयोजित करून सुनावणी दरम्यान स्पष्ट आदेश देत, मूळ अर्जातील किमान एका कामासंबंधीची माहिती विनामूल्य देण्याचे निर्देश संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांना दिले होते, तसा आदेश देखील अर्जदार यांना प्राप्त झालेला आहे.

मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करताना संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती अपूर्ण स्वरूपात, तसेच दिशाभूल करणारी माहिती रजिस्टर पोस्टाने पाठवून कायद्याच्या मूळ उद्दिष्टांनाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सदर माहितीबाबत विचारणा करण्यासाठी अर्जदाराने जनमाहिती अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, जनमाहिती अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अर्जदार याबाबत राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील व माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ कलम – १८ अन्वये तक्रार देखील दाखल करणार आहे. प्रश्न असाही निर्माण होत आहे की, माहिती लपवण्याचे नेमके कारण काय ? सदर माहितीत नेमकं दडलंय काय ? माहिती देण्यासाठी का टाळाटाळ केली जात आहे ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

या प्रकारामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय, नंदुरबार कार्यालयाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, माहितीचा अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित होत आहेत. जनतेच्या हक्काच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याची जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारे पायमल्ली होत असेल तर हे मात्र चुकीचेच आहे. माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हि १०० % शासकीय कार्यालयांची आहे परंतु अशा जनमाहिती अधिकारी व कार्यालयाच्या अशा चुकीच्या कार्यपद्धतीमुळे  सदर कायद्याचा मूळ उद्देशालाच बाजूला सारण्याचे काम होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

Next Post

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

Next Post
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह २ जण ताब्यात;३६ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d