Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“चला किल्ला बनवूया .. “( एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
“चला किल्ला बनवूया .. “( एक दिवसीय कार्यशाळेत छोट्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ला)

जळगाव दि.8 – के.सी.ई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र जळगाव आणि ओजस्विनी कला महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चला किल्ला बनवूया” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या स्थापत्य कलेच्या रचनांबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. ओजस्विनी कला महाविद्यालयातील शिल्पकार देवा सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मातीचा किल्ला बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. किल्ला बनवत असताना मातीचा प्रकार, बुरुज, तटबंदी, किल्ल्याचा मुख्य दरवाजा कमान यांची प्रात्यक्षिकातून माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत तोफ -रणगाडे, मावळे इ.ची प्रत्यक्ष सुबक निर्मिती करून घेण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत सहभागी विद्यार्थ्यांनी घरी किल्ला बनवण्याचे आश्वासन दिले असून ,सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यशाळेस केसीई सोसायटीचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर ,कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा.प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनास प्रा.पियुष बडगुजर, प्रा. दिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ,प्रा.देवेंद्र गुरव, शिवम चौधरी, कुणाल जाधव, भूषण भोळे,राजेंद्र सरोदे आदींचे मौलिक सहकार्य प्राप्त झाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथे सेंट्रल बँकच्या एटिएमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन!!!

Next Post

जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

Next Post
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo