Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2023
in जळगाव
चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला म्हणजे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलीस कै. नथू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चे सहकार्य लाभले आहे.
पाडवा पहाट या प्रातःकालीन सभेचे यंदाचे हे २२ वे पुष्प प्रतिष्ठान गुंफत असून गोव्याच्या सांस्कृतिक भूमितुन दोन युवा कलावंतांना प्रतिष्ठान जळगावकर रसिका समोर सादर करणार आहेत.
या वर्षी *मुग्धा गावकर व प्राची जठार* या दोन प्रतिभा संपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना साथ संगत करणार आहेत *ऋषिकेश फडके* (तबला) *दत्तराज सुरलकर* (संवादिनी) *पंकज सायनेकर* (बासरी) तर निवेदन आकाशवाणी पणजीच्या उद्घोषिका *मानसी वाळवे* या करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नथू शेठ चांदसरकर ट्रस्टचे अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी असतील. चुकवू नये अशा या प्रातःकालिन मैफिलीसाठी सर्व जळगावकर रसिकांनी यावे व या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. सगुण वेळिप, (संचालक, कला व संस्कृती संचालनालय) श्री. अशोक परब (उपसंचालक), सिद्धार्थ गायतोंडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख) गोवा सरकार तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल रसिकांना नम्र निवेदन की कृपया ५.५० पर्यंत आसनस्थ व्हावे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा

Next Post

डॉ सौ पुनम ताई पाटील यांनी केली चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

Next Post
डॉ सौ पुनम ताई पाटील यांनी केली चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

डॉ सौ पुनम ताई पाटील यांनी केली चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d