Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार आचरणात असावेत – मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांनी कारकिर्दीत चौफेर क्षेत्रात एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासह त्यांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात असावेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर यांनी केले.

बहूजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम च्या वतीने महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे तैलचित्राचे अनावरण श्री. कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. फारुख शेख, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) श्री. चंद्रशेखर मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोरमचे केंद्रीय कार्यकारिणी सचिव श्री.बी. डी. जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत प्रशासनाचे आभार मानले.

कार्यक्रमास वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) रामचंद्र वैदकर, कार्यकारी अभियंता संजय तडवी, नितीन पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता  धीरज बारापत्रे, विजय रावणकर, व्यवस्थापक (मासं) उध्दव कडवे, कनिष्ठ विधि अधिकारी जिवन बोडके, जनसंपर्क अधिकारी  किशोर खोबरे तसेच संघटनेचे पदाधिकारी नितीन रामकुवर, चेतन नागरे, राहुल वडनेरे, चरण पांढरे, अनिल राठोड, महेश अडकमोल, प्रशांत शिरसाळे, गणेश जाधव, प्रशिक भास्कर, भालचंद्र काकुस्ते, इशत्याक पटेल, गोदावरी भांगरे, माधवी कुलकर्णी, ज्योती महाजन आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार  परिमंडळ सचिव श्री. विजय सोनवणे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

Next Post

वाकोद येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post
वाकोद येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

वाकोद येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo