लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव- (प्रतिनिधी – ईश्वर खरे)- लोहारा येथून जवळ असलेल्या कासमपुरा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी शासनाच्या जलतारा योजनेत उत्कृष्ट काम करत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल 15 ऑगस्ट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र तानाजी बैसाणे यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,सीईओ मिलिंद करणवाल , खा. स्मिता वाघ गट विकास अधिकारी अंजने उपस्थित होते तर सरपंच सतीश राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी रोजगार सहाय्यक दिलीप कोळी ग्रामपंचायतीचे लिपिक राजेंद्र खरे यांचे याबद्दल कौतुक होत आहे. जलतारा योजना यशस्वी केल्याबद्दल राजेंद्र बैसाणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातुन सरपंच व ग्रा. प. सदस्य व पत्रकार बांधव कासंमपुरा ग्रामपंचायतचे विशेष कौतुक होत आहे.











