Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जलसंधारण अंतर्गत येणारे दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा -मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जलसंधारण अंतर्गत येणारे दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा -मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील विविध योजनामधुन जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यांच्या देखभाल व दुरूस्तीअभावी आवश्यक तेवढा जलसंचय होत नसल्याने ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली. राज्यातील जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे, यासाठी दुरुस्ती करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्यात यावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांनी दिल्या.

मंत्रालयात मांजरा व तेरणा नदीवरील उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील ९ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये रूपांतर करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व मालवण तालुक्यातील जलसंधारणाच्या प्रकल्पांचा, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जलसंधारणाच्या अंतर्गत दुरुस्तीची कामे आणि बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व बुलढाणा तालुक्यातील जलसंधारण विभाग अंतर्गत करावयाच्या दुरुस्तीच्या कामांचा आढावा जलसंधारण मंत्री श्री. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या बैठकांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, कुडाळ- मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, मोताळा व बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, आमदार ज्ञानराज चौघुले, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांच्यासह विविध जिल्ह्यातील विभागाचे अधिकारी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांनी मांजरा नदीवरील कळंब तालुक्यातील 6, उस्मानाबाद तालुक्यातील 9, वाशी, उमरगा व लोहारा तालुक्यांतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे याचे उच्च पातळी / बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी विस्तार व सुधारणा दोन्ही पद्धतीचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करावे असे निर्देश दिले.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध प्रकल्पांचे दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव बैठकीत मांडले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कोणत्या विभागांचे प्रकल्पांचे दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशा कामांसाठी तात्काळ मंजुरी देण्यात येईल असे सांगून, जी दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही श्री.गडाख यांनी दिल्या.कुडाळ तालुक्यातील व मालवण तालुक्यातील जलसंधारण अंतर्गत करावयाच्या दुरूस्तीसाठीच्या प्रकल्पांचे अंदाजपत्रक विभागाकडे सादर करावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व बुलढाणा तालुका यांच्या अंतर्गत 7 साखळी बंधारे बांधण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही श्री.गडाख यांनी यावेळी दिले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी

Next Post

वातावरणीय बदलावर उपाययोजना करताना लोकसहभाग गरजेचा -विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर

Next Post
वातावरणीय बदलावर उपाययोजना करताना लोकसहभाग गरजेचा -विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर

वातावरणीय बदलावर उपाययोजना करताना लोकसहभाग गरजेचा -विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d