Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावची केळी’ पोस्ट पाकिटाचे गांधी उद्यानात 11 रोजी प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी) -जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनात जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा 3 टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे (विशेष इव्हलपचे) प्रकाशन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते करण्यात येत आहे.

जैन टिश्युकल्चर रोपे व उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून जळगावची केळीची ओळख पोस्टाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याहून उत्तम योग तो कोणता असावा. जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास जळगावकर नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, त्याच प्रमाणे जैन टिश्यू कल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतीशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘जळगावची केळी आता पोस्टाच्या पाकिटावर!’

या तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावची ओळख सांगणाऱ्या केळीचे चित्र व माहिती असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन देखील करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्याची केळीचे आगार म्हणून जागतिक ओळख आहे. जळगावला देशाच्या केळीचे केंद्र म्हणून सर्वदूर परिचय आहे. महाराष्ट्र राज्यातील 90,000 हेक्टर केळीच्या बागांपैकी सुमारे 60 टक्के भाग जळगावमध्ये मोडतो. त्यात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली टिश्युकल्चर क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन व नवनवीन प्रयोग केले आहेत. जैनचे टिश्युकल्चर आणि उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या केळी येथे पिकविल्या जातात. शेतकऱ्यांच्या उत्पादनात 4 पटीहून अधिक वाढ झालेली आहे. केळी हे फळ उत्कृष्ठ फळ आहे त्यात भरपूर पोषक अन्नद्रव्ये आहेत. याबाबतचे 2017 मध्ये भौगोलिक संकेतक प्रमाण निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडे प्राप्त झालेले आहे. जळगावची केळी म्हणजे अतुल्य भारत व अमूल्य खजाना असा गौरव आहे. ह्या कार्यक्रमात जळगावच्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकांकिका या अभिनयाचा पाया – शशिकांत वडोदकर

Next Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे ११ रोजी गांधी उद्यानात उद्घाटन

Next Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे ११ रोजी गांधी उद्यानात उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo