Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व;गुजरातला होईल राष्ट्रीय महिलांची बुद्धिबळ स्पर्धा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/06/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.१९ प्रतिनिधी – क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे फिडे नामांकित महिलांची राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव येथील कु. सािनया रफिक तडवी हिन ८ पैकी ७ गुण (६ विजय २ ड्रॉ) मिळवून स्पर्धेत अपराजित राहत प्रथम क्रमांक मिळविला. सानिया हिला चषक व १५ हजार रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते.

प्रमुख अतिथी म्हणून मदर अली, प्रशांत विघ्नेश्वर, संग्राम शिंदे, आश्विन मुसळे, मुख्य ऑर्बिटर सप्नील बनसोड, ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे, कुमार कनकम, नरेंद्र कन्नाके उपस्थित होते. या कामगिरीमुळे गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सानिया तडवी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तिने स्पर्धेत कोल्हापूर ची दिव्या पाटील, आदिती कायल पुणे, ह्यांना हरवून श्रुती काळे औरंगाबाद, तसेच दिशा पाटील कोल्हापूर ह्याच्याशी बरोबरीत डाव साधत महाराष्ट्रात यश मिळवून विजय मिळवला. दि.१६ ते १८ जून दरम्यान तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातूून ४४ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा ८ राऊंड मध्ये घेण्यात आली. सानिया ही महिला बाल कल्याण विभागाचे उपजिल्हाधिकारी रफिक तडवी यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतूक केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम एकमेकांच्या समन्वयातून यशस्वी करावा – जिल्हाधिकारी अमन मित्तल

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योगा”दिवस उत्साहात संपन्न

Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योगा”दिवस उत्साहात संपन्न

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे "आंतरराष्ट्रीय योगा"दिवस उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo