Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेकरिता 2 एकर जमीन उपलब्ध करुन द्यावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातील पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेकरिता 2 एकर जमीन उपलब्ध करुन द्यावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

मुंबई, दि. 11 : ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ताब्यातील मौजे पाळधी बु ता. धरणगाव येथील 2 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी  यासंदर्भातील कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा केला.

ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, श्री.वायू नंदन, सुभाष भुजबळ, शिवशंकर नाईक यावेळी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, ग्रामपंचायत पाळधी बु. ता. धरणगाव जिल्हा जळगावकरिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लॉट उभारण्यासाठी विद्यापीठाच्या ताब्यातील मौजे पाळधी बु ता. धरणगाव येथे 2 एकर जमिन गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी याठिकाणी उंच पाण्याची टाकी उभी करण्यात येणार असून या योजनेमुळे विद्यापिठाला आणि गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी लागणारी दोन एकर जागा विद्यापीठाने उपलब्ध करुन द्यावी. ही जमिन विद्यापिठाच्या नावावर असणार आहे. जिल्हाधिकारी याबबतचा प्रस्ताव तयार करुन तातडीने कुलगुरुंकडे पाठवावा. यामध्ये जमिनीचा सर्व नंबर देवून दोन एकर जागेचा उल्लेख करण्यात यावा. विद्यापिठाने यावर तातडीने कार्यवाही करुन एनओसी उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही श्री.सामंत यांनी दिले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, येथील गावातील लोकांनी विद्यापिठाला जमिनी उपलब्ध करुन दिल्या आहे. नळ पाणी योजना सर्वांसाठी आहे. या योजनेमुळे येथील गावाला व विद्यापीठाला पाणी मिळणार आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल २२१ रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

प्रगती माध्यमिक शाळेत सावित्री ते जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन

Next Post
प्रगती माध्यमिक शाळेत सावित्री ते जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन

प्रगती माध्यमिक शाळेत सावित्री ते जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d